Amit Rohidas banned for one match Paris Olympics sakal
क्रीडा

Paris Olympics : सेमीफायनलपूर्वी भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का; 'या' खेळाडूवर एका सामन्याची बंदी

Indian Hockey Team, Paris Olympics 2024 News Update : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने दमदार खेळ दाखवत उपांत्य फेरीत थाटात एन्ट्री मिळाली.

Kiran Mahanavar

Amit Rohidas banned for one match Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने दमदार खेळ दाखवत उपांत्य फेरीत थाटात एन्ट्री मिळाली. मात्र सेमीफायनल सामन्याआधी संघाला मोठा धक्का बसला आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) भारताच्या अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घातली आहे, ज्यामुळे तो मंगळवारी जर्मनीविरुद्ध होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. रविवारी ब्रिटनविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रोहिदासला रेड कार्ड दाखवण्यात आले, त्यामुळे तो दुसऱ्या क्वार्टरपासूनच मैदानातून बाहेर होता.

FIH च्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, “4 ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध ब्रिटन सामन्यादरम्यान FIH आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अमित रोहिदासला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबन सामना क्रमांक 35 (भारताचा जर्मनी विरुद्धचा उपांत्य सामना) मध्ये लागू होईल, ज्यामध्ये अमित रोहिदास भाग घेणार नाहीत."

सामन्याच्या सतराव्या मिनिटाला रोहिदासची हॉकी स्टिक एका ब्रिटीश खेळाडूच्या डोक्यावर लागली, परंतु रेफ्रींला हे जाणूनबुजून केलेले कृत्य वाटले म्हणून त्याला संपूर्ण सामन्यातून बाहेर काढले. त्यामुळे भारतीय संघ 10 खेळाडूंसह सुमारे 42 मिनिटे खेळला.

रेड कार्डानंतरही भारतीय हॉकी संघाने दमदार पुनरागमन केले. कर्णधार हरमनप्रीत सिंगने खेळाच्या 22व्या मिनिटाला गोल करून भारताला ग्रेट ब्रिटनविरुद्ध 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तथापि, 27 व्या मिनिटाला ली मॉर्टनने गोल केल्याने ग्रेट ब्रिटनने लवकरच बरोबरी साधली.

यानंतर उर्वरित दोन क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही आणि सामना शूटआऊटमध्ये गेला. या सामन्यात श्रीजेशने अनेक गोल सेव्ह केले. अखेर भारतीय संघाने शूटआऊटमध्ये 4-2 असा सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Government : मणिपूरचे राज्य सरकार अल्पमतात? ‘एनपीपी’ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचा दावा

IPL Mega Auction 2025: 'हे' ५ अनकॅप गोलंदाज होऊ शकतात करोडपती, फ्रँचायझींची असेल नजर

Tirupati Temple : तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामास बंदी; ‘टीटीडी’ ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

Sports Bulletin 19th November: दिल्ली कॅपिटल्सने रिटेन न करण्यावर ऋषभ पंतने सोडलं मौन ते रॉजर फेडररचं राफेल नदालला भावनिक पत्र

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

SCROLL FOR NEXT