Women Cricket Team 
क्रीडा

Women Cricket Team: महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुजूमदार

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू अमोल मुजूमदार यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Amol Muzumdar has been appointed as the new Head Coach of India Women national cricket team BCCI)

सुलक्षणा नाईल, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य कोच म्हणून अमोज मुजूमदार यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून त्यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने यासंदर्भातील घोषणा आज केली.

अमोल मुजूमदार यांनी आपल्या क्रिकेट करियरमध्ये प्रथम श्रेणी सामने खेळताना प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांनी १७१ सामने खेळताना ३० शतके आणि ११ हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यांनी १०० पेक्षा अधिक लिस्ट ए गेम्स आणि १४ टी-२० सामान्यांमध्ये खेळी केली आहे. त्यांनी मुंबईकडून खेळताना अनेक रणजी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यांनी आंध्र प्रदेश आणि आसामचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.

मुजूमदार यांची प्रतिक्रिया

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर मुजूमदार यांनी प्रतिक्रिया दिली. महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचा खूप आनंद होत आहे. सीएसी आणि बीसीसीआयने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत मी त्यांचे धन्यवाद मानतो. ही एक मोठी जबाबदारी आहे. पण, प्रतिभाशाली खेळाडूंसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. पुढील दोन वर्ष खूप महत्त्वाचे आहेत, कारण यादरम्यान दोन विश्वकप होणार आहेत, असं ते म्हणाले.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT