Avani Lekhara  Twitter
क्रीडा

महिंद्रांकडून दुहेरी गोल्डचा 'आनंद' आणखी द्विगुणित

यापूर्वी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील गोल्डन बॉय नीरज चोप्राला देखील हिच अलिशान कार भेट दिली होती.

सुशांत जाधव

टोकियो पॅरालिंपिक (Tokyo Paralympic) स्पर्धेत भारतवासियांना सोनेरी क्षणाची अनुभूती देणाऱ्या खेळाडूंसाठी महिंद्रा अँण्ड महिंद्राकडून खास गिफ्ट देण्यात येणार आहे. कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भातील घोषणाही केलीये. टोकियोतील स्पर्धत देशाला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नेमबाज अवनी लेखारासाठी XUV700 SUV ही नवी अलिशान कार लाँच करण्यात येणार आहे. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील मोठी घोषणा केलीये. यापूर्वी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील गोल्डन बॉय नीरज चोप्राला देखील हिच अलिशान कार भेट दिली होती.

भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांच्या विनंतीनुसार, दिव्यांग व्यक्तींना वापरता येईल अशी एसयुव्ही कार तयार करण्याची सूचना कंपनीतील डेव्हलपमेंट विभागात काम करणाऱ्या वेलू यांना दिलीये. पहिली कार अवनीला भेट देण्याचा उल्लेखही आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. महिंद्रा कंपनीमधील प्रोडक्ट डेव्हलपमेंट विभाग दिव्यांगांना फायदेशीर ठरेल, अशी विशेष कार तयार करण्याच्या कामालाही लागले आहेत. नेमबाज अवनी लेखारासह गोल्ड मेडलिस्ट विश्वविक्रमी भाला फेकणाऱ्या सुमित अंतिल याला देखील अलिशान कार बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील महिला नेमबाजीतील 10 मीटर एअर रायफल क्लास SH1 फायनलमध्ये 249.6 स्कोअरसह अवनी लेखारानं सुवर्ण पदकाचे लक्ष्य साध्य केलं होते. पॅरालिंपिक स्पर्धेत पुरुष एफ 64 क्रीडा प्रकारात विश्वविक्रमी कामगिरीसह सुमितच्या रुपात भारताला नवा गोल्डन बॉय मिळाला. हरियाणाच्या सोनीपतच्या 23 वर्षीय सुमितने पाचव्या प्रयत्नात 68.55 मीटर अंतर भाला फेकला. हा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 2015 मध्ये दुचाकी अपघातामध्ये त्याने आपले दोन्ही पाय गमावले होते. 66.95, 68.08, 65.27, 66.71, 68.55 अशी कामगिरी नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT