Death Of Anshuman Gaekwad former Indian Cricketer  Esakal
क्रीडा

Anshuman Gaekwad Death: टीम इंडियाचे माजी सलामीवीर हरले आयुष्याची लढाई, अंशुमन गायकवाड यांचे निधन

Indian Cricket Team: 12 वर्षांच्या कारकिर्दीत गायकवाड यांनी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले ज्यात त्यांनी 1983 मध्ये जालंधर येथे पाकिस्तानविरुद्ध 2 शतके आणि 201 च्या सर्वोच्च धावसंख्येसह 1154 धावा केल्या आहेत.

आशुतोष मसगौंडे

भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी ब्लड कॅन्सरशी प्रदीर्घ लढाईनंतर निधन झाले. 12 वर्षांच्या कारकिर्दीत गायकवाड यांनी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले ज्यात त्यांनी 1983 मध्ये जालंधर येथे पाकिस्तानविरुद्ध 2 शतके आणि 201 च्या सर्वोच्च धावसंख्येसह 1154 धावा केल्या आहेत.

गायकवाड हे दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले होते.

अंशुमन गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 40 कसोटी सामन्यांच्या 70 डावांमध्ये 30.07 च्या सरासरीने 1985 धावा केल्या. यामध्ये त्यांनी 10 अर्धशतके आणि 2 शतके झळकावली. त्याचबरोबर त्यांच्या नावावर 2 विकेट्सही आहेत.

याशिवाय सलामीला फलंदाजी करणाऱ्या गायकवाड यांनी 15 एकदिवसीय सामन्यांच्या 14 डावात 269 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्यांनी 1 अर्धशतक झळकावले आहे. यात नाबाद 78 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय त्यांच्या नावे 1 विकेटही आहे.

इतकेच नव्हे तर गायकवाड यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली होती. त्यांनी 206 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 41.56 च्या सरासरीने 12,136 धावा केल्या होत्या. या काळात त्यांनी 34 शतके आणि 47 अर्धशतके झळकावली आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधली त्याची सर्वोत्तम धावसंख्या 225 धावा होती. याशिवाय, गायकवाड यांनी 55 लिस्ट-ए सामने देखील खेळले आहेत, ज्यात त्यांनी 32.67 च्या सरासरीने एकूण 1601 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गायकवाड यांनी 1997 ते 1999 या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही भूमिका पार पाडली आहे. त्यांचे वडिल दत्ता गायकवाड यांनीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्तव केले होते.

दरम्यान कॅन्सरशी झुंज देताना त्यांच्यासमोर अर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यांनी ही बाब माजी सलामीवीर संदीप पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर पाटील यांनी कपिल देव यांच्याबरोबर गायकवाड यांना उपचाराशाठी अर्थिक मदत करावी अशी साद बीसीसीायला घातली होती. त्यानंतर बीसीसीायचे सचिव जय शाह यांनी गायकवाड यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT