Anushka Sharma recalls Virat Kohlis journey Sakal
क्रीडा

तू, मी आणि एमएस...अनुष्कानं सांगितली कोहलीच्या कॅप्टन्सीची अनटोल्ड स्टोरी

सुशांत जाधव

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) एक भलीमोठी भावनिक पोस्ट लिहित विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टन्सीच्या प्रवासाच्या आठवणीला उजाळा दिला आहे. किंग कोहलीने अचानकपणे भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अनुष्का शर्माने इन्स्टाच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिने विराट कोहलीसोबतचे दोन खास फोटो शेअर केले आहेत. दोन्ही फोटोमध्ये विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या जर्सीमध्ये दिसतोय. एका फोटोमध्ये अनुष्का विराटला किस करताना दिसते. तर दुसऱ्या फोटोत विराट एकटा दिसतोय. (Anushka Sharma recalls Virat Kohlis journey as he steps down as Test captain)

अनुष्कानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, मला आजही तो दिवस आठवतोय. 2014 मध्ये एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तू कॅप्टन होणार असल्याचे तू मला सांगितले होतेस. त्यादिवशी तू, मी आणि एमएस यांनी गप्पाही मारल्या होत्या. तुझ्या दाढी आता लवकरच पिकेल असा मेजेशीर संवादही आपल्या तिघांमध्ये झालेला आठवतोय. त्याकाळापासून आतापर्यंत मी तुझी पिकणाऱ्या दाढीपेक्षाही खूप काही गोष्टी पाहिल्या ज्यात कमालीची वृद्धी दिसली, अशा शब्दांत अनुष्काने विराट कोहलीच्या कॅप्टन्सीच्या यशस्वी प्रवासाचे वर्णन केले आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व करत असताना तू गाठलेला टप्पा हा थक्क करणारा आहे. तुझ्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं मिळवलेले यश अविश्वसनीय होते. तू ज्या पद्धतीने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलेस त्याचा मला अभिमान वाटतो. 2014 मध्ये ज्यावेळी कॅप्टन्सी स्विकारलीस त्यावेळी तू यंग होतास. तुझ्यासमोर मोठी आव्हान होती. फिल्डसह आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील आव्हानांचा तू यशस्वीपणे सामना केलास, अशा आशयाचा उल्लेखही अनुष्का शर्माने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

2014 मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद हे विराट कोहलीच्या खांद्यावर आले. धोनीने आपल्या कारकिर्दित जे करुन दाखवलं ते कोहलीनं नुसते टिकवलं नाही तर तो टीम इंडियाला आणखी पुढे घेऊन गेला. भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधाराच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. खास रेकॉर्ड आपल्या नावे करुन त्याने कॅप्टन्सीला अलविदा केले आहे. कॅप्टन्सीमधून मुक्त झाल्यानंतर चाहत्यांना त्याच्याकडून एक फलंदाज म्हणून मोठ्या कामगिरीची अपेक्षा अजूनही असेल. त्यामुळे त्याचा इथून पुढचा प्रवास कसा असणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT