archery world cup women gold hattrick jyoti aditi parneet created history
archery world cup women gold hattrick jyoti aditi parneet created history Sakal
क्रीडा

वर्ल्डकप तिरंदाजीत महिलांची सुवर्ण हॅट््ट्रिक; ज्योती-आदिती-परनीतने इतिहास घडवला

सकाळ वृत्तसेवा

अंतल्या (तुर्कस्तान) : जागतिक तिरंदाजीतील कंपाउंड प्रकारात अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय महिला संघाने विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट््ट्रिक केली. ज्योती सुरेखा, आदिती स्वामी आणि परनीत कौर या त्रिमूर्तींनी हा इतिहास घडवला.

तुर्कस्थान येथे झालेल्या या विश्वकरंडक तिरंदाजी (स्टेज ३) स्पर्धेत ज्योती-आदिती-परनीत या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित इस्तोनिया संघाचा २३२-२२९ असा पराभव केला. २०२४ मधील ही तिसरी विश्वकरंडक स्पर्धा आहे. यंदाच्या वर्षात शांघाय आणि येंचॉन येथे झालेल्या स्पर्धेतही भारतीय महिला संघाने सुवर्णपदकाचा सन्मान मिळवला होता.

तुर्कस्थान येथे आज स्पर्धेचा तिसरा टप्पा (स्टेड ३) पार पडला. भारताच्या या महिला संघाला पहिल्या फेरीत केवळ १० संघ असल्यामुळे पुढे चाल मिळाली. त्यानंतर अंतिम फेरी गाठताना त्यांनी अल साल्वादोर संघावर २३५-२२७ आणि तुर्कस्थानचा २३४-२२७ असा पराभव केला.

एकीकडे महिलांचा संघ इतिहास घडवत असताना क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारतीय पुरुष संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यापासून थोडक्यात हुकला. प्रियांश, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश फुगे यांची उपांत्य सामन्यात तुर्कस्थानकडून शूटऑफमध्ये हार झाली. दोन्ही संघांची २३६-२३६ अशी बरोबरी झाली होती, पण शूटऑफमध्ये भारतीय संघ ३०*-३० असे थोडक्यात मागे पडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hathras stampede: सातारा ते जोधपूर... देशातील अशा घटना जिथे चेंगराचेंगरीमुळे गमावले शेकडो भाविकांनी प्राण

UP Hathras Stampede :सत्संगानंतर चेंगराचेंगरी;उत्तर प्रदेशात ११६ जण मृत्युमुखी; १५० जखमी

Milind Narvekar: मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीने चुरस वाढली;विधान परिषद निवडणूकः अकरा जागांसाठी बारा उमेदवार

Cow Milk Rate: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर

Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

SCROLL FOR NEXT