Arjun Tendulkar Bowling Ranji Trophy Debut  esakal
क्रीडा

Arjun Tendulkar : RCB चा फलंदाज ठरला अर्जुनची पहिली शिकार; जमलेली जोडी फोडून गोव्याला दिला दिलासा

अनिरुद्ध संकपाळ

Arjun Tendulkar Ranji Trophy Debut : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आपले रणजी पदार्पण ऐतिहासिक केले. त्याने आपल्या वडिलांप्रमाणेच रणजी ट्रॉफीच्या पदार्पण सामन्यात शतकी खेळी करण्याची किमया साधली. यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. अर्जुन तेंडुलकरने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली. आता त्याने फलंदाजी नंतर गोलंदाजीतही आपला दम दाखवला. त्याने राजस्थानच्या महत्वपूर्ण दोन विकेट घेत त्यांना मोठा धक्का दिला.

अर्जुन तेंडुलकरने गोव्याचा निम्मा संघा माघारी गेला असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 207 चेंडूत 120 धावांची शतकी खेळी केली. त्याने आपली ही खेळी 16 चौकार आणि 2 षटकार मारले. अर्जुन आणि सुयश प्रभुदेसाई यांनी सहाव्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारी रचत गोव्याला 400 च्या पार पोहचवले. प्रभुदेसाईने 212 धावांची द्विशतकी खेळी केली. याच जोरावर गोव्याने पहिल्या डावात 547 धावा ठोकल्या.

याच्या प्रत्युत्तरात राजस्थानने देखील चांगली फलंदाजी केली. राजस्थानचा पहिला सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर यश कोठारी आणि महिपाल लोमरोर यांनी दुसऱ्या विकेटसाठी दमदार 128 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी मोहित रेडकरने यश कोठारीला 96 धावांवर बाद करत फोडली. दरम्यान, महिपाल लोमरोरवर राजस्थानचा डाव सावरण्याची जबाबदारी होती.

महिपालने सलमान खान सोबत अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र अर्जुन तेंडलुकरने ही धोकादायक ठरू पाहणारी जोडी फोडली. त्याने 63 धावा करणाऱ्या महिपालला बाद करत रणजी ट्रॉफीमधला आपला पहिला बळी टिपला. महिपाल लोमरोर हा 19 वर्षाखालील भारताकडून खेळला आहे. तसेच तो सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.

महिपालला बाद केल्यानंतर अर्जुनने 40 धावा करून सेट झालेल्या सलमान खानला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत आपला दुसरा बळी टिपला. अर्जुनने सेट झालेली जोडी फोडण्याचे काम करत संघासाठी मोलाची कामगिरी केली. राजस्थानने तिसऱ्या दिवसअखेर 7 बाद 245 धावा केल्या आहेत. अर्जुनने 14 षटके टाकत 77 धावात 2 बळी टिपले. त्याने दोन षटके निर्धाव टाकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT