Arjun Tendulkar to replace Jasprit Bumrah no place for Tim David Mumbai Indians strongest XI for IPL 2023 cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IPL 2023: बुमराहच्या जागी खेळणार अर्जुन तेंडुलकर? मुंबईच्या Playing-11 कर्णधार करणार मोठा बदल

मुंबई इंडियन्सची ही आहे प्लेइंग इलेव्हन...

सकाळ ऑनलाईन टीम

Mumbai Indians Indian Premiere League 2023 : आयपीएलचा 16वा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहे. सर्व संघांचे खेळाडू त्यांच्या संघात सामील झाले आजुन खेळाडूंनी सामन्यासाठी सराव सुरू केला आहे. पहिला सामना 31 मार्चला गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे.

आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने एकूण 5 आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. त्यांचा पहिला सामना 2 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध खेळणार आहे.

आयपीएल 2023 थरार खरं तर 31 मार्चपासून सुरू होणार आहे, परंतु सर्वाधिक चर्चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या मुंबई इंडियन्सची होत आहे. त्यातल्या त्यात जास्त मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनची आहे. कारण जसप्रीत बुमराह या हंगात खेळणार नाही.

आयपीएलमध्ये 2 एप्रिलला बंगलोरविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन मुंबई इंडियन्ससाठी सलामी करतील. रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी खूपच धोकादायक आहे आणि हे दोन्ही फलंदाज पॉवर-प्लेमध्ये धावा लुटण्यात पटाईत आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस जो (बेबी एबी डिव्हिलियर्स) म्हणून ओळखला जातो, तो मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 व्या क्रमांकावर उतरेल तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. तिलक वर्माला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. अष्टपैलू कॅमेरून ग्रीन मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सहाव्या क्रमांकावर खेळेल तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला सातव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.

लेगस्पिनर पियुष चावला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकी विभागाचे नेतृत्व करेल. पियुष चावलासह डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलाणीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. वेगवान गोलंदाजांपैकी जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांना संधी दिली जाऊ शकते.

मुंबई इंडियन्सची ही असू शकते प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, शम्स मुलानी, जेसन बेहरेनडॉर्फ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT