Arrest Kohli trends on Twitter sakal
क्रीडा

ट्विटरवर #ArrestKohli का ट्रेंड करतोय; रोहितशी काय आहे संबंध?

फॅनच्या हत्येची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच विराट कोहलीला अटक करण्याची मागणी

Kiran Mahanavar

Arrest Kohli trends on Twitter : लोकांची क्रिकेटची आवड कधीच कमी होत नाही. टीम इंडियाच्या खेळाडूंचे चाहते काहीवेळा सुरक्षेचा घेरा तोडून मैदानात येतात. आपल्या आवडत्या खेळाडूचा टॅटू अंगावर काढणारे अनेक चाहतेही आहेत. मात्र नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या अरियालपूर जिल्ह्यात विराट कोहलीच्या एका चाहत्याने रोहित शर्माच्या फॅनची हत्या केली आहे.

रोहित शर्माच्या फॅनच्या हत्येची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर कोहलीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. पी विघ्नेशची अरियालपूर जिल्ह्यात हत्या करण्यात आली आहे. तो रोहित आणि मुंबई इंडियन्सचा चाहता आहे. त्याच्या हत्येचा आरोप कोहली आणि रॉयल चॅलेंजर्सचा चाहता एस. त्यावर धर्मराज आहे.

11 ऑक्टोबर रोजी धर्मराज आणि विघ्नेश सिडको इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गेले होते. येथे दोघांनी दारू पार्टी केली. या पार्टीदरम्यान दोघांमध्ये क्रिकेटबाबत वाद सुरू झाला. दरम्यान विघ्नेशने आरसीबीची खिल्ली उडवली. याचे धर्मराजला खूप वाईट वाटले आणि त्याने त्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून ठार केले. धर्मराजला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रोहितच्या चाहत्याच्या हत्येची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. ट्विटरवर काही लोकांनी कोहलीच्या अटकेची मागणी केली आहे. 'अॅरेस्ट कोहली' हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागला आहे. दुसरीकडे कोहलीच्या चाहत्यांनी हा हॅशटॅग बेकार असल्याचे म्हटले आहे. कोहलीच्या चाहत्यांनी लिहिले की, हा हॅशटॅग ट्रेंड करणाऱ्यांनी विचार करावा की यात काही अर्थ आहे का?.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT