Ashes Series Australia vs England  
क्रीडा

Ashes : स्टार्कच्या माऱ्यासमोर इंग्लंडचे शेर झाले ढेर

अनिरुद्ध संकपाळ

अ‍ॅडलेड : अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आज इंग्लंडने आपला पहिला डाव 2 बाद 17 धांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र इंग्लंडला आपल्या तिसऱ्या दिवशी 236 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने (Mitchell Starc) भेदक मारा करत 37 धावात इंग्लंडचे 4 फलंदाज माघारी धाडले. त्याला नॅथन लायननने 3 विकेट घेत चांगली साथ दिली.

इंग्लंडकडून तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि कर्णधार जो रुट (Joe Root) यांनी कांगारुंचा चांगला प्रतिकार केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचली. मात्र जो रुट 62 तर डेव्हिड मलान 80 धावा करुन बाद झाल्यानंतर आलेल्या पुढच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. इंग्लंडचे तब्बल सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 237 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फॉलोऑन न देता आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात करत इंग्लंडविरुद्धची आघाडी वाढवली. (Australia vs England)

इंग्लंडचा पहिला डाव 236 धावात आटोपला, ऑस्ट्रेलियाकडे 237 धावांची भक्कम आघाडी

इंग्लंडच्या फलंदाजीला लागली गळती, स्टार्कचा भेदक मारा

बटलरही माघारी, चहापानापर्यंत इंग्लंडच्या 6 बाद 169 धावा

इंग्लंडचा डाव गडगडला, निम्मा संघ 164 धावात माघारी

इंग्लंडला तगडा झटका, जो रुट 62 धावा करुन बाद

कर्णधार जो रुटची अर्धशतकी खेळी, इंग्लंडच्या 150 धावा पूर्ण

डेव्हिड मलानचे झुंजार अर्धशतक

इंग्लंडची तिसऱ्या दिवशी सावध सुरुवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT