Joe Root esakal
क्रीडा

Ashes |AUSvsENG : रूट - मलानची झुंजार भागीदारी

जो रुट - डेव्हिड मलानची अर्धशतके, इंग्लंडच्या दिवसअखेर २२० धावा

अनिरुद्ध संकपाळ

ब्रिसबेन : अॅशेस (The Ashes) मालिकेतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने (England Cricket Team) दुसऱ्या डावात २ बाद २२० धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडचा (England) कर्णधार जो रुट (Joe Root) आणि डेव्हिड मलान (Dawid Malan) यांनी झुंजार फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद १५९ धावांची भागीदारी रचली. दिवस अखेर रुट ८६ तर मलान ८० धावा करुन नाबाद होते. इंग्लंड अजूनही ५८ धावांनी पिछाडीवर आहे.

तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३४३ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या (Australia Cricket Team) ट्रॅविस हेडने (Travis Head) संघाला मजबूत आघाडीच्या दिशेने नेले. त्याच्या १४८ चेंडूत केलेल्या १५२ धावांच्या तुफानी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २७८ धावांची आघाडी घेतली.

दिवसअखेर इंग्लंडच्या २ बाद २२० धावा; रुट ८६ वर तर डेव्हिड मलान ८० धावा करुन नाबाद

जो रुट (Joe Root) आणि डेव्हिड मलानची तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी

जो रुट (Joe Root) आणि डेव्हिड मलानची (Dawid Malan) अर्धशतके, इंग्लंडची दीडशतकी मजल

इंग्लंड अजूनही १७५ धावांनी पिछाडीवर

61-2 : स्टार्कने इंग्लंडचा दुसरा सलामीवीरही धाडला माघारी, हासीब हामीद २७ धावा करुन बाद

पॅट कमिन्सने इंग्लंडला दिला पहिला धक्का; रोरी बर्न्स १३ धावा करुन माघारी

ऑस्ट्रेलियाकडे २७८ धावांची मजबूत आघाडी

अखेर ट्रॅव्हिस हेड १५२ धावांवर बाद, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४२५ धावांवर संपुष्टात

ऑस्ट्रेलियाला ९ वा धक्का नॅथन लायन १५ धावा करुन बाद

ट्रॅव्हिस हेडचे दमदार दीडशतक ऑस्ट्रेलिया ४०० च्या पार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT