Ashes Series Pat Cummins Captaincy Rohit Sharma esakal
क्रीडा

Pat Cummins Captaincy : पहिला डाव फसला तरी कमिन्सनं करून दाखवलं, रोहित कधी शिकणार?

अनिरुद्ध संकपाळ

Ashes Series Pat Cummins Captaincy Rohit Sharma : नुकत्याच झालेल्या WTC Final मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताविरूद्ध कांगारूंच्या फलंदाजांनी पहिल्याच दिवशी 327 धावा ठोकल्या होत्या. तिथेच भारत बॅकफूटवर गेला होता. भारताची जशी WTC Final मध्ये अवस्था होती तशीच अवस्था अवघ्या काही दिवसात झालेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाची झाली होती.

इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करत पहिल्याच दिवशी 393 धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाही पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेली होती. मात्र कांगारूंनी सामन्यावरील आपले नियंत्रण पुन्हा मिळवले अन् इंग्लंडचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 8 बाद 393 धावांवर घोषित करण्याची रणनिती अंगलट आली.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया WTC Final आणि अॅशेस मालिकेतील इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना या दोन्ही सामन्यांची तुलना केली तर रोहित सेनेपेक्षा पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियन संघाने चांगल्या प्रकारे बाऊन्स बॅक केल्याचे दिसून येते.

अती आक्रमकपणा नडला

आर या पार या रणनितीने कसोटी क्रिकेट खेळण्याऱ्या इंग्लंडने अॅशेस मालिकेच्या पहिल्या सामन्यात पहिल्याच दिवशी 393 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. इंग्लंडचे त्यावेळी 8 फलंदाज बाद झाले होते. विशेष म्हणजे शतकवीर जो रूट हा 118 धावा करून नाबाद होता. तरी देखील इंग्लंडने आपला डाव घोषित करण्याचा धोका पत्करला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लॉयनने 4 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून त्यानेच सर्वाधिक 29 षटके टाकली.

इंग्लंडने हा धोका पत्करला त्यावेळी संपूर्ण त्यांच्या बॅझबॉल क्रिकेटची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. सर्वत्र वाहवा सुरू होती मात्र ऑस्ट्रेलियासाठी इथेच सामन्यात पुनरागमन करण्याची संधी होती. कारण इंग्लंड नक्कीच पहिल्या डावात अजून 30 ते 40 धावा करू शकला असता. जो रूट नाबाद होता. 400 धावांचा मार्क पार करणे याला मानसिकदृष्ट्या खूप महत्व आहे. तेथेच इंग्लंड गंडली अन् ऑस्ट्रेलियाने संधी साधली.

उस्मान ख्वाजाची ओळख जपली

ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव सुरू केला त्यावेळी इंग्लंडप्रमाणे अती आक्रमकपणा दाखवला नाही. त्यांचा सालामीवीर उस्मान ख्वाजा हा सेशन खेळून काढत मोठी खेळी करण्यासाठी ओळखला जातो. पॅट कमिन्सने ही त्याची ही ओळख जपली. दुसरे करतात म्हणून आपणही नाहक आक्रमकता दाखवणे प्रत्येकवेळी यशस्वी ठरत नाही हे उस्मान ख्वाजाच्या पहिल्या डावातील खेळीने सिद्ध करून दाखवले. ख्वाजाच्या खेळीचे श्रेय हे पॅट कमिन्सला देखील जाते.

त्याने ख्वाजाला त्याच्या पद्धतीचे क्रिकेट खेळण्याची मुभा दिली. ख्वाजाने 321 चेंडूत 141 धावांची खेळी केली. सलामीला आलेला उस्मान ख्वाजा हा 113 व्या षटकात बाद झाला. म्हणजे त्याने जवळपास चार सेशल खेळून काढले.

दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांनी आक्रमकपणे धावा केली. त्यांनी ख्वाजासोबत भागीदारी रचत इंग्लंडच्या पहिल्या डावातील 393 धावांच्या जेवढ्या जवळ जाता येईल तेवढ्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना यश मिळाले इंग्लंडला पहिल्या डावात फक्त 7 धावांची आघाडी घेता आली.

याउलट भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या डावात भारत 174 धावांनी पिछाडीवर गेला. भारताला ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांच्या जवळ जाता आले नाही. भारताकडून अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर सोडले तर इतर कोणाला मोठी खेळी खेळता आली नाही. तसेच एकाही फलंदाजाने तीन चार सत्र खेळून काढण्याच्या रणनितीने फलंदाजी केली नाही.

नॅथन लॉयनवर विश्वास

अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात पिछाडी भरून काढत इंग्लंडच्या तोडीची फलंदाजी केली. यात हेड, ग्रीन, कॅरी यांनी ख्वाजासोबत भागीदारी रचली. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडला आवाक्या बाहेरची धावसंख्या उभारू दिली नाही.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी भागीदारी रचण्यापासून रोखले. इंग्लंडकडून जो रूट आणि हॅरी ब्रुक्स यांनी प्रत्येकी 46 धावा केल्या. या खेळीच इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सर्वोच्च खेळी ठरल्या. कांगारूंकडून नॅथन लॉयनने 24 षटके टाकली.

इंग्लंडचा दुसरा डाव 66 षटकात गुंडाळला. त्यातील 24 षटके ही फिरकीपटू नॅथन लॉयनने टाकल्या. ऑस्ट्रेलियाकडे चार वेगवान गोलंदाज असूनही कमिन्सने नॅथनवर विश्वास दाखवला. तो कांगारूंचा अव्वल गोलंदाज आहे. त्याने पहिल्या डावात देखील 29 षटके टाकत 4 विकेट्स घेतल्या होत्या. दोन्ही डावात मिळून लॉयनने 8 विकेट्स घेतल्या.

इंग्लंडच्या संघात पाच डावखुरे फलंदाज होते. हे पाहून कमिन्सने मिचेल स्टार्क हा आपल्या सर्वात वेगवान गोलंदाजाला बाहेर बसवत नॅथन लॉयनला खेळवले. हे धारिष्ठ रोहित शर्माला दाखवता आले नाही. त्याने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या रविचंद्रन अश्विनला कांगारूंच्या संघात पाच डावखुरे फलंदाज असूनही बाहेर बसवले.

इंग्लंडमध्ये प्लेईंग 11 मध्ये खेळवणाचे धाडस दाखवणाऱ्या कमिन्सला नॅथन लायनने निराश केले नाही. त्याने दुसऱ्या डावात इंग्लंडचे चार मोहरे टिपले. कमिन्सने देखील कर्णधाराला साजेशी कामगिरी करत 18.2 षटकात 63 धावा देत 4 बळी टिपले.

भागीदारी महत्वाची

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दुसरा डाव हा 273 धावात संपुष्टात आणला. पहिल्या डावात फक्त 7 धावांची आघाडी मिळालेल्या इंग्लंडला कांगारूंसमोर 300 प्लस दावांचे टार्गेट उभे करण्यात अपयश आले. तरी 280 धावांचे आव्हान चौथ्या आणि पाचव्या दिवशी पार करणे सोपं काम नाही.

मात्र ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक फलंदाजाने संघासाठी आपली भुमिका बजावली. उस्मान ख्वाजा याही सामन्यात टिकून खेळला. त्याच्या भोवती ऑस्ट्रेलियाने आपली इनिंग बिल्ट केली. कांगारूंनी छोट्या छोट्या मात्र अत्यंत महत्वाच्या भागिदारी रचत हळूहळू धावांचा पाठळाग सुरू ठेवला. यात ख्वाजाने एक बाजू लावून धरली.

तर इतर फलंदाजांनी झपाट्याने धावा करण्याची भुमिका बजावली. 20, 25, 30 धावा करत कांगारू इंग्लंडच्या धावसंख्येच्या जवळ पोहचले. उस्मान ख्वाजाने 197 चेंडूत 65 धावांची अँकर इनिंग खेळली. सलामीला आलेला ख्वाजा सात फलंदजांसोबत भागीदारी करत आठव्या क्रमांकावर बाद झाला.

ख्वाजा बाद झाला त्यावेळी विजय ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीपथात होता असं नाही. मात्र कर्णधार पॅट कमिन्सने 44 धावांची झुंजार खेळी केली. त्याला नॅथन लॉयनने 16 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत फलंदाजीतही आपले योगदान दिले.

कांगारूंच्या या विजयाने एक गोष्ट अधोरेखित झाली. जर तुम्ही कॅलक्युलेटेड रिस्क घेतली तर ती जास्त फायद्याची ठरते. दाखवायची म्हणून आक्रमक भुमिका घेण्यात काही अर्थ नसतो. ही भुमिका कधी ना कधी अंगलट येतेच. इंग्लंडच्या पराभवानं ही शिकवण दिलीच!

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT