Ashley Giles 
क्रीडा

इंग्लंडचे खेळाडू IPL सामन्यांना मुकणार!

आयपीएल (IPL restart) सामन्यांदरम्यान कोरोना विषाणूने बायो बबलमध्ये प्रवेश केला होता.

कार्तिक पुजारी

आयपीएल (IPL restart) सामन्यांदरम्यान कोरोना विषाणूने बायो बबलमध्ये प्रवेश केला होता. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आएपीएल सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली- आयपीएल (IPL restart) सामन्यांदरम्यान कोरोना विषाणूने बायो बबलमध्ये प्रवेश केला होता. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आएपीएल सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, बीसीसीआयने आएपीएल स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्धार केला असून पुढील सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये भरवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने 18 सप्टेंबरपासून सुरु केले जाणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे. असे असले तरी इंग्लडसह अनेक देशांचे खेळाडू या सामन्याला उपस्थिती लावण्याची शक्यता कमी आहे. बेअरस्टो आणि जोस बटलर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताना दिसले होते. (Ashley Giles said England will not change plans to accommodate IPL restart)

इंग्लंड पुरुष क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक अॅशले गिल्स (Ashley Giles) यांनी यासंदर्भातील सूतोवाच केले आहेत. आयपीएलसाठी इंग्लंड क्रिकेट संघाच्या नियोजित स्पर्धांमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंना उर्वरित सामन्यांना मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. अॅशले गिल्स यांनी सांगितल्यानुसार, नियोजित वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. बांलगादेश आणि पाकिस्तानसोबतची क्रिकेट स्पर्धा आयपीएलच्या काळातच भरवल्या जात आहेत. इंग्लंड संघाचा भारतासोबतचा अंतिम कसोटी सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर एक आठवड्याच्या अंतराने इंग्लंड संघ बांगलादेशसाठी रवाना होईल. त्यानंतर 14 आणि 15 ऑक्टोंबरला पाकिस्तानसोबत टी-20 सामने नियोजित आहेत.

आयपीएलचे सामने 18 सप्टेंबरपासून सुरु होणे अपेक्षित असून ते 10 ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहेत. याकाळात इंग्लंडचे खेळाडू इतर स्पर्धांमध्ये गुंतलेले असल्याने ते आयपीएल खेळू शकणार नाहीत. अॅशले यांनी सांगितल्यानुसार, नियोजित स्पर्धांचे वेळापत्रक बदलण्याचा कोणताही विचार नाही. दरम्यानच्या काळात आम्ही काही खेळाडूंना विश्रांती देणार आहोत. पण, याचा असा अर्थ नाही की, त्यांनी इतरत्र जावे आणि क्रिकेट खेळावे.

दरम्यान, 4 मे रोजी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर हे सामने यूएईमध्ये घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याची माहिती कळत आहे. 10 डबल हेडर आणि 7 सिंगल सामने घेण्याचे नियोजित आहे. अजून 31 सामने खेळवायचे आहेत. 9 किंवा 10 ऑक्टोंबरला आयपीएलचा अंतिम सामना होईल. भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंडसोबतची अखेरची कसोटी 14 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर सर्व भारतीय खेळाडू यूएईसाठी रवाना होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT