Asia Cup 2022 Pakistan vs Afghanistan Super Four : आशिया कपमधील सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर 130 धावांचे आव्हान ठेवले. आजच्या या सामन्यावर भारताची फायनलची आशा जोडली गेली होती. मात्र ज्या अफगाणिस्तानच्या विजयाच्या जोरावर भारत फायनलची स्वप्न पाहत आहे. त्या अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर फार मोठे आव्हान उभा केले नाही. पाकिस्तानकडून हारिस रौऊफने 2 तर हुसनैन, नसीम शाह, शादाब खान मोहम्मद नसीम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. अफगाणिस्तानकडून इब्राहीम जादरानने सर्वाधिक 35 धावा केल्या. (Asia Cup 2022 Afghanistan Set 130 Runs In Front Of Pakistan In Super 4 last Match)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम अफगाणिस्तानला फलंदाजीला पाचारण केले. अफगाणिस्तानचे सलामीवीर हजरतुल्ला झजाई आणि रहमानुल्ला गुरबाज यांनी क्रीजवर येताच पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या दोघांनी 3 षटकात 27 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर हारिस रौऊफने गुरबाजला बाद करत अफगाणिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली.
दुसरा सलामीवीर हजरतुल्ला झजाई देखील 21 धावांची भर घालून परतला. यानंतर इब्राहीम झादरानने अफगाणिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला म्हणवी तशी साथ लाभली नाही. अखेर हारिस रौऊफनेच झादरानला 35 धावांवर बाद करत अफगाणिस्तानला मोठा धक्का दिला. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी देखील टिच्चून मारा करत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना रोखले.
झादरानने अफगाणिस्तानला शतक पार करून दिले. मात्र त्यानंतर राशिद खानने 15 चेंडूत नाबाद 18 धावा करत अफगाणिस्तानला 20 षटकात 6 बाद 129 धावांपर्यंत पोहचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.