Asia Cup 2022 After India Defeated By Pakistan Sri Lanka Social Media Trends  esakal
क्रीडा

Boycott IPL : धोनी परत ये! राहुल - पंतला नारळ द्या, नेटकरी रोहितच्या नेतृत्वावरही भडकले

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 : भारताने आशिया कप सुपर 4 चा दुसरा सामना देखील गमावला. श्रीलंकेने भारताचा 6 गडी आणि 1 चेंडू राखून पराभव केला. श्रीलंकेविरूद्धच्या पराभवानंतर भारताचे आशिया कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. सात वेळचा विजेत्या भारताला सुपर 4 मधूनच गाशा गुंडळावा लागल्याने याची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून येत आहे. नेटकऱ्यांचा विशेष रोष हा आयपीएलवर असल्याचे दिसून येते. त्यामुळेच #BoycottIPL हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. याचबरोबर नेटकऱ्यांना भारताला पहिला टी 20 वर्ल्डकप जिंकून देणारा महेंद्र सिंह धोनी देखील आठवला. (Asia Cup 2022 After India Defeated By Pakistan Sri Lanka Boycott IPL Come Back Dhoni Hashtags Trends)

भारताने आशिया कपची सुरूवात धडाक्यात केली होती. भारताने ग्रुप स्टेजमधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. टीम इंडिया ग्रुप A मधील दोन्ही सामने जिंकून अव्वल राहिली. मात्र सुपर 4 मध्ये भारताला आपला हा विनिंग फॉर्म कायम राखता आला नाही. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव सहन केला. त्यानंतर करो या मरो सामन्यात श्रीलंकेने भारताला लोळवले त्यामुळे भारताचे आव्हान जवळपास संपुष्टातच आले. आयपीएलमधील एक एक स्टार खेळाडू हे भारतीय संघात आहेत. ते आयपीएल खेळताना एकट्याच्या जीवावर सामना जिंकून देतात. मात्र आशिया कपमधील त्यांची कामगिरी खूप सुमार होती. त्यामुळे चाहत्यांनी आपला सगळा रोष आयपीएलवर व्यक्त केला.

पंत - केएल राहुलला आता डच्चू द्या

नेटकऱ्यांनी आयपीएलबरोबरच संघातील दोन खेळाडूंकडे आपला मोर्चा वळवला. ऋषभ पंत आणि उपकर्णधार केएल राहुलला संघातून काढून टाकण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली. या दोघांचे 2022 मधील कामगिरी पाहता रोहित शर्मा आणि राहुल द्रविड देखील या दोघांना पाठीशी घालू शकणार नाहीत. केएल राहुलने आयपीएलनंतर थेट आशिया कप खेळला. तर दुसरीकडे ऋषभ पंतची टी 20 मधील कामगिरी अजूनच खालावत चालली आहे.

रोहितच्या कॅप्टन्सीवर पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह

भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आल्यापासून भारताची टी 20 मध्ये चांगली कामगिरी झाली होती. मात्र आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करने नेटकऱ्यांना रूचलेले नाही. त्यांनी संघ निवडीवर नाराजी व्यक्त करत श्रेयस अय्यर, दीपक चाहर फिट असतानाही त्यांना संघात स्थान का देण्यात आले नाही. इशान किशन आणि संजू सॅमसन यासारेखे दर्जेदार युवा खेळाडू संघाच्या बाहेर का आहेत असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

धोनी परत ये!

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात शेवटच्या 2 चेंडूवर 2 धावांची गरज असताना अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली मात्र विकेटकिपर ऋषभ पंतला चोरटी धाव घेणाऱ्या फलंदाला धावबाद करण्याची चांगली संधी असतानाही धावबाद करता आले नाही. त्यावेळी सर्वांनाच महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली. धोनी सध्या फक्त आयपीएल खेळत आहे. तो आयपीएलमध्ये देखील सुपर फिट दिसतो. त्यामुळे चाहत्यांनी महेंद्रसिह धोनीने पुनरागमन करावे आशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT