Rahul Dravid Asia Cup IND vs PAK sakal
क्रीडा

Asia Cup : IND vs PAK सामन्यापूर्वी टीम इंडियाला गुड न्यूज! राहुल द्रविड संघात सामील

आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडिया 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

Kiran Mahanavar

Asia Cup IND vs PAK : आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडिया 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले असून सामन्यापूर्वी दुबईत संघात सामील होणार आहेत. राहुल द्रविडला गेल्या आठवड्यातच कोरोना संसर्ग झाला होता, त्यामुळे तो टीम इंडियासोबत यूएईला जाऊ शकला नाही. द्रविडच्या अनुपस्थितीत बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मण यांना प्रशिक्षक म्हणून पाठवले.

क्रिकबझच्या वृत्तानुसार राहुल द्रविड शनिवारी 27 ऑगस्टला यूएईला पोहोचेल आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान द्रविड भारतीय ड्रेसिंग रुमचा भाग असेल, तर अंतरिम प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण घरी जाणार आहे. एका सूत्राने सांगितले की, लक्ष्मण शनिवारीच भारतात येणार आहे आणि पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात तो भारतीय संघाचा भाग असणार नाही.

23 ऑगस्ट रोजी द्रविड कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती देताना, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आशिया कप 2022 साठी यूएईला जाण्यापूर्वी नियमित चाचण्या घेतात. पॉझिटिव्ह आढळले आहेत. निगेटिव्ह COVID-19 रिपोर्ट आल्यानंतर तो टीममध्ये सामील होईल.

आशिया चषकापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर द्रविडला विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रशिक्षकाची भूमिका निभावली. द्रविडला संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर, बीसीसीआयने लक्ष्मणला अंतरिम प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेहून दुबईला पाठवले जेथे टीम इंडियाने त्याच्या देखरेखीखाली सराव सत्रे घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

Uddhav Thackeray : भाजपचा ‘सत्ता जिहाद’ महाराष्ट्राची जनता संपवेल! : उद्धव ठाकरेंची गर्जना

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 नोव्हेंबर 2024

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ नोव्हेंबर २०२४ ते २३ नोव्हेंबर २०२४)

SCROLL FOR NEXT