Asia Cup IND vs HK  esakal
क्रीडा

Asia Cup IND vs HK : सूर्या तळपला! हाँगकाँगला मात देत भारत सुपर 4 मध्ये दाखल

अनिरुद्ध संकपाळ

India vs Hong Kong 4th Match Group A : भारताने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. भारताने ठेवलेल्या 193 धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगला धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली. तर विराट कोहलीने आपला फॉर्म परत मिळवत 44 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदाीर रचली.

भारताने ठेवलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगची सुरूवात खराब झाली. अर्शदीप सिंगने हाँगकाँगला पहिला धक्का दिला. त्याने यासीम मुर्तझाला 9 धावांवर बाद केले. त्यानंतर निझाकत खान आणि बाबर हयात यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जडेजाने ही जोडी फोडली. त्याने निझाकत खानला 10 धावांवर धावबाद केले.

यानंतर हयातने आक्रमक खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाने त्याची खेळी 41 धावांवर संपवली. किंचित शाहने 30 धावांची खेळी करत हाँगकाँगला शतक पार करून दिले. मात्र भुवनेश्वरने त्याला बाद करत त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. आवेशनेही इजाज खानची विकेट घेत स्वतःचे खाते उघडले. अखेर हाँगकाँगने 20 षटकात 5 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून आवेश खान, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, भारताने हाँगकाँगविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 192 धावा चोपल्या. संथ सुरूवातीनंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत नाबाद 98 धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत नाबाद 68 धावांची आक्रमक खेळी केली. तर विराट कोहलीने 44 चेंडूत 59 धावा केल्या.

भारताने प्रथम फलंदाजी करताना संथ सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 5 षटकात 38 धावांची सलामी दिली. मात्र धावांची गती वाढवण्याच्या नादात रोहित शर्मा 21 धावा करून करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी बॉल टू रन धावा करत दुसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचली.

मात्र केएल राहुल 39 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आला आणि त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. विराट कोहलीनेही आपला गिअर बदलला. या दोघांनी आपल्या भागीदारीची सुरूवात 14 व्या षटकापासून केली. त्यांनी पुढच्या सहा चेंडूत 98 धावांची दमदार भागीदारी रचत भारताला 192 धावांपर्यंत पोहचवले.

IND 192/2 (20) : सूर्यकुमारचे धडाकेबाज अर्धशतक

सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत अर्धशतक ठोकत भारताला चांगले टार्गेट स्टे करण्यास मदत केली. त्याने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमारने 26 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या तर विराट कोहलीने 44 चेंडूत 59 धावांची खेळी केली.

153-2 (18 Ov) : विराट कोहलीचे प्रतिक्षित अर्धशतक, भारताने वेग वाढवला

विराट कहोलीने जवळपास 194 दिवसांनंतर अर्धशतक ठोकले. तर सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत भारताला 150 च्या पार पोहचवले.

94-2 : केएल राहुल बाद, भारताला दुसरा धक्का

सलामीवीर केएल राहुल सुरूवातीपासूनच बॉल टू रन धावा करत होता. मात्र 12 षटकानंतर त्याने आक्रमक फटके मारण्यास सुरूवात केली. दरम्यान, मोहम्मद गाझनफरने त्याला 36 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

 IND 85/1 (12) : भारताचा वेग मंदावला

हाँगकाँगविरूद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना फिरकीपटूंनी चांगलेच बांधून ठेवले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांंनी बॉल टू रन धावाच करता आल्या.

38-1 भारताला पहिला धक्का, कर्णधार माघारी 

भारताचा कर्णधार रोहित शर्माला आयुष शुक्लाने 21 धावांवर बाद करत भारताला पाचव्या षटकात पहिला धक्का दिला.

हाँगकाँगने नाणेफेक जिंकली

हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आजच्या सामन्यात एक बदल केला आहे. गेल्या सामन्यातील स्टार प्लेअर हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळाली आहे.

भारत Vs हाँगकाँग 

भारताला आजचा सामना जिंकून सुपर 4 मध्ये प्रवेश करण्याची नामी संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT