Asia Cup 2022 Mohammad Rizwan Knee Injury  esakal
क्रीडा

Asia Cup 2022 : पाकिस्तानवरील दुखापतींचे ग्रहण सुटेना! रिझवानच्या गुडघ्याचे स्कॅन...

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 Mohammad Rizwan : आशिया कप सुपर 4 मध्ये पाकिस्तानने भारताचा 5 विकेट्स राखून पराभव केला. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव केला होता. सुपर 4 मधील सामन्यात पाकिस्तानचा विकेटकिपर मोहम्मद रिझवानने 51 चेंडूत 71 धावांची खेळी करत विजयात मोठा वाटा उचलला होता. मात्र याच सामन्यात विकेटकिपिंग करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत (Knee Injury) झाली होती. आता हाच रिझवानचा दुखरा गुडघा पाकिस्तानची डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होईल अशी आशा व्यक्त केली जातेय. या पार्श्वभुमीवर जर रिझवानची दुखापत बळावली तर पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा असेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद रिझवानला विकेटकिपिंग करताना दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने पाकिस्ताने टेन्शन वाढले होते. मात्र त्यानंतर त्याने उपचार घेऊन सामना खेळला. त्याने दुखऱ्या गुडघ्यानिशी 51 चेंडूत 71 धावांची खेळी करत भारताला पराभवाच्या खाईत लोटले. दरम्यान, रविवारी रात्रीच रिझवानच्या गुडघ्याचा एमआरआय स्कॅन झाला होता. या स्कॅनचा रिपोर्ट येणे अजून बाकी आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ व्यवस्थापन त्याच्याबाबतीत निर्णय घेताना पूर्ण काळजी घेत आहे.

भारत फलंदाजी करत असताना 15 व्या षटकात मोहम्मद हुसनैनने एक बाऊन्सर टाकला होता. हा बाऊन्सर पकडण्यासाठी मोहम्मद रिझवानने हवेत उंच उडी मारली मात्र त्यानंतर तो वाईट पद्धतीने खाली पडला. त्याचा गुडघा दुखावल्यामुळे तो वेदनेने कळवळत होता. पाकिस्तानच्या फिजिओंनी मैदानात धाव घेत त्याच्या गुडघ्यावर प्राथमिक उपचार केले होले. त्यानंतर तो उभा राहिला मात्र त्याला सरळ चालता येत नव्हते. अशा परिस्थितीतही त्याने आपली विकेटकिपिंग पूर्ण केली आणि 90 मिनिटे फलंदाजी देखील करत 51 चेंडूत 71 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली.

वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये देखील दाखवली होती झुंजार वृत्ती

गेल्या वर्षी युएईमध्येच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलपूर्वी त्याला इन्फेक्शन झाल्याने 36 तास रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याने सेमी फायनल खेळत 67 धावांची खेळी करत पाकिस्तानला 176 धावांपर्यंत पोहचवले. मात्र हा सामना ऑस्ट्रेलियान जिंकत फायनल गाठली होती.

पाकिस्तानला यंदाच्या आशिया कपमध्ये दुखापतींनी ग्रासले आहे. आधी शाहीन आफ्रिदी आशिया कप सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी संपूर्ण स्पर्धेला मुकला. त्यांनतर भारताविरूद्धच्या सुपर 4 मधील सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज दहानी देखील दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला. आता मोहम्मद रिझवानच्या दुखापतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT