Asia Cup 2022 Pakistan Defeat India In Super 4 Arshdeep Drop Catch Bhuvneshwar Kumar  esakal
क्रीडा

IND vs PAK : अर्शदीपचा ड्रॉप कॅच, हिरो ते झिरो भुवी.. भारताच्या पराभवाची 5 कारणे

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 India Vs Pakistan : आशिया कपच्या सुपर 4 मध्ये पाकिस्तानने भारताचा 5 विकेट्सनी पराभव केला. भारताने पाकिस्तानसमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पाकिस्तानने हे आव्हान 19.5 षटकातच पार केले. भारताला सामन्यापूर्वीच दुखापतींचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे रोहित शर्माला संघात काही बदल करावे लागले. संघाचा चांगले संतुलून निर्माण करून देणारा रविंद्र जडेजाच बाहेर गेल्याने रोहित शर्मासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आजच्या भारताच्या पराभवाला फक्त टीम कॉम्बिनेशन जबाबदार नाही. त्याला भारताच्या अपयशी मधली फळी, ड्रॉप कॅच, वाईड बॉलर आणि मोहम्मद रिझवान हे फॅक्टर देखील भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले. (Asia Cup 2022 Pakistan Defeat India In Super 4 Arshdeep Drop Catch Bhuvneshwar Kumar Five Reasons Of India's Loss)

टीम कॉम्बिनेशन बसवताना उडाली तारांबळ

भारतीय संघाला सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला होता. रविंद्र जडेजा आशिया कपलाच मुकल्यामुळे भारताचे टीम कॉम्बिनेशन बिघडले. हे कॉम्बिनेशन दुरूस्त करण्याच्या नादात भारताने आपल्या सर्वात चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या फलंदाजाला दिनेश कार्तिकलाच बाहेर ठेवले. दिनेश कार्तिकला बाहेर ठेवून त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली. मात्र त्याला फराशी कमाल करता आली नाही. त्याला रिव्हर्स स्विप मारण्याचा मोह टाळता आला नाही. दुसऱ्या बाजूला दीपक हुड्डाला त्याच्या अष्टपैलूत्वामुळे संघात स्थान मिळवले. मात्र त्याला गोलंदाजीच देण्यात आली नाही. जर पाचच गोलंदाज वापरायचे होते तर संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांनाही खेळवले असते तरी चालले असते.

भारताची मधील फळी ढेपाळली

दुबईच्या खेळपट्टीवर तुम्हाला नाणेफेक गमावून देखील जर सामना जिंकायचा असेल तर प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागले. रोहितने हे सामन्यापूर्वीच ओळखले होते. त्यामुळेच तो एक अतिरिक्त फलंदाज घेऊन मैदानात उतरला. त्यानंतर रोहित आणि राहुलने फायरी स्टार्ट देण्याचा प्रयत्न देखील केला.

मात्र या प्रयत्नावर मधल्या फळीतील फलंदाजांनी पाणी फेरले. हार्दिक पांड्या शुन्य, ऋषभ पंत 14 आणि दीपक हुड्डा 16 धावा करून माघारी फिरले. विराट कोहली एका बाजूने दमदार फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने त्याला कोणाचीच साथ लाभली नाही. त्यामुळे भारताच्या जवळपास 15 चे 20 धावा कमी झाल्या. याचा फायदा नंतर पाकिस्तानला चेस करताना झाला.

भारताच्या विजयात आडवा येणारा मोहम्मद रिझवान

भारत आणि पाकिस्तान सामन्यात सलामीवीर मोहम्मद रिझवान हा हमकास धावा करतोच. आजच्या सामन्यात देखील त्याने पाकिस्तानला सुरूवातीला धक्के बसल्यानंतर डाव सावरला. त्याने 51 चेंडूत 71 धावांची झुंजार खेळी केली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद नवाज सोबत 63 धावांची भागीदारी रचली. मोहम्मद नवाजने देखील 20 चेंडूत 42 धावांची आक्रमक खेळी करत रिझवानच्या झुंजार खेळीला दमदार साथ दिली.

मोहम्मद रिझवानला शांत ठेवणे भारताच्या गोलंदाजांना आजच्या सामन्यात देखील जमले नाही. भारताच्या पराभवाला मोहम्मद रिझवानची ही झुंजार खेळी देखील तितकीच जबाबदार आहे.

अर्शदीपने सोडलेल्या कॅच सोबत मॅचही सुटली

अर्शदीपने आजच्या सामन्यात चांगला मारा केला होता. आजच्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई या दोन युवा गोलंदाजांनीच प्रभावी मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजील वेसन घालण्याचे काम केले. मात्र रवी बिश्नोई टाकत असलेल्या 18 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने आसिफ अलीचा सोपा कॅट गाळला. याच आसिफ अलीने 8 चेंडूत 18 धावा चोपल्या आणि भारताचा विजयी घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात अर्शदीपनेच त्याचा बळी घेतला मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातातून निसला होता.

हिरो झालेला भुवी व्हिलन झाला

आसिफ अलीने अर्शदीपने दिलेल्या जीवनदानाचा फायदा 19 व्या षटकात उचलला. या षटकात भुवनेश्वर कुमारने 19 धावा दिल्या त्यातील 11 धावा या एकट्या आसिफने केल्या. विशेष म्हणजे 16 व्या षटकात भुवीने फक्त 4 धावा देत मोहम्मद नवाजची महत्वपूर्ण विकेट घेतली होती. मात्र या कामगिरीवर त्याने 19 व्या षटकात पाणी फेरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मनसे नेते अमित ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT