asia cup 2022 pakistan vs hong sakal
क्रीडा

Asia Cup : पाकिस्तानचे टेन्शन वाढलं; हाँगकाँगची घेतली धास्ती

पाकिस्तानसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण इथे चूक झाली तर त्याला स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतात.

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 : आशिया कप मध्ये भारताविरुद्ध पाच गडी राखून पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानी संघाचा पुढील सामना शुक्रवारी हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण इथे चूक झाली तर त्याला स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतात. हाँगकाँगवर पाकिस्तानचा वर्चस्व आहे यात शंका नाही. पण त्याचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने आपल्या संघाला इशारा दिला आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना इंझमाम म्हणाले की, पाकिस्तानने हाँगकाँगला अजिबात हलके घेऊ नये.

पाकिस्तानने हाँगकाँगची घेतली धास्ती!

इंझमाम-उल-हक म्हणाला की, टी-20 फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ नये. हाँगकाँगला टीम इंडियाविरुद्ध 40 धावांनी पराभव पत्करावा लागला पण त्याने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर पाकिस्तानला हार पत्करावी लागू शकते.

माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने पाकिस्तानला प्लेइंग इलेव्हन बदलण्याचा सल्ला दिला आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात हैदर अलीला संधी मिळायला हवी. इंझमाम म्हणाला की, पाकिस्तानी संघ शोएब मलिकला मिस करत आहे. पाकिस्तानी संघात त्याच्यासारखा खेळाडू नाही. मोहम्मद अक्रम ज्युनियरच्या दुखापतीनंतर संघात स्थान मिळालेला वेगवान गोलंदाज हसन अलीला संधी देण्याबाबतही इंझमाम बोलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT