Asia Cup 2022 Ticket Sales Begin August 15 : आशिया चषक 2022 सुरू होण्यासाठी आता दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने रविवारी 14 ऑगस्ट रोजी स्पर्धेच्या सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीबाबत एक माहिती दिली. भरपूर प्रतीक्षेनंतर ACC ने सांगितले की, आशिया कप 2022 च्या तिकिटांची विक्री सोमवार 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 27 ऑगस्टपासून दुबईत सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला भिडणार आहे.
व्होल्टेज सामन्यासह स्पर्धेच्या सर्व सामन्यांची तिकिटे अधिकृत तिकीट भागीदार platinumlist.net वर उपलब्ध आहेत. चाहते या वेबसाइटद्वारे भारत विरुद्ध पाकिस्तानसह सर्व सामन्यांची तिकिटे बुक करू शकतात. भारत आणि पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांना नेहमीच जास्त मागणी असते. 23 ऑक्टोबर रोजी MCG येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी T20 विश्वचषक सामन्यासाठी सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
आशियाई क्रिकेट परिषदेने अधिकृत घोषणेमध्ये सांगितले की, आशिया कपच्या तिकिटांची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू होईल. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची क्षमता सुमारे 25,000 आहे. पहिल्याच दिवशी या महान सामन्याची सर्व तिकिटे विकली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.