Rohit Sharma  
क्रीडा

Asia Cup 2023 : 'दडपण घेणार नाही, पण पुढील दोन महिने...', आशिया कपआधी कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Rohit Sharma : सकारात्मक असो वा नकारात्मक, बाहेरून येणाऱ्या घटकांसाठी दरवाजे मी पुढील दोन महिन्यांसाठी बंद केले आहेत आणि शक्य तेवढा निर्धास्थ रहाणार आहे. परंतु पुढील दोन महिन्यांत मला संघासह अविस्मरणीय आठवणी निर्माण करायच्या आहेत, असे मत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

काही दिवसांत सुरू होणारी आशिया करंडक आणि त्यानंतर मायदेशात होणारी विश्वकरंडक स्पर्धा यासाठी कर्णधार म्हणून रोहितवर दडपण येण्याची शक्यता आहे, पण रोहितने त्यासाठी स्वतःचा मार्ग आतापासूनच शोधला आहे.

आशिया करंडक स्पर्धेसाठी बंगळूर येथे सराव शिबिर संपल्यानंतर रोहितने पीटीआयशी संवाद साधला. कोण काय बोलतोय याकडे दुर्लक्ष करून स्वतःची मानसिकता मला बळकट करायची आहे आणि त्यासाठी २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वीची मानसिकता मला प्रथम फलंदाज म्हणून पुन्हा तयार करायची आहे. त्या आठवणी, इंग्लंडमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत रोहितने सर्वाधिक पाच शतकांचा विक्रम करताना ६४८ धावा केल्या होत्या.

मी आता चांगल्या आणि सक्षम मानसिकतेमध्ये आहे आणि ही मानसिकता पुढच्या आव्हानासाठी अधिक सक्षम करण्याकरिता मला २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील आठवणी जाग्या करायच्या आहेत, असे रोहित म्हणतो. पुढचे दोन महिने रोहितचेही भवितव्य निश्चित करणारे ठरणार आहेत, परंतु रोहित त्याची चिंता करत नाही.

एका रात्रीत बदल नाही

खेळाडूचे यश-अपयश एका रात्रीत बदलत नाही. एका निकालामुळे किंवा एका अजिंक्यपदामुळे माझ्यामध्ये बदल झाला नाही. गेल्या १६ वर्षांपासून मी आहे तसाच आहे. त्यात बदल करावा असे मला कधीच वाटले नाही. म्हणून पुढच्या दोन महिन्यांत आखलेली ध्येय कशी गाठायची हाच विचार माझा आणि माझ्या संघाचा असणार आहे, असे रोहितने सांगितले.

पाच आयपीएल विजेतेपद आणि एक आशिया करंडक विजेतेपद (२०१९) असे कर्णधार म्हणून यश मिळवणाऱ्या रोहित शर्माने जून महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद कसोटी अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

आकडेवारीला प्राधान्य देत नाही

गेल्या १६ वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये ‘तू तुझे प्रभावी अस्तित्व निर्माण केले आहेस का’ या प्रश्नावर रोहितने स्पष्ट ‘नाही’ असे सांगितले. मी स्वतःबद्दल फुशारकी मारणार नाही. लोकच ठरवू शकतील, मी काहीच बोलणार नाही, असे रोहितने सांगितले. १७ वर्षांच्या कारकिर्दीत रोहितने ३० एकदिवसीय शतके १० कसोटी आणि चार ट्वेन्टी-२० शतकांसह १७ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. मी आकडेवारीला प्राधान्य देत नाही, प्रेक्षकांसमोर मैदानात घालवलेला वेळ मला आनंद देत असतो, असे रोहित पुढे म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT