Asia Cup 2023 Final no Reserve Day : श्रीलंकेत खेळल्या जात असलेल्या आशिया कपचे सामने खेळापेक्षा पावसामुळे जास्त चर्चेत आहेत. असा एकही सामना झाला नाही जो पावसामुळे खराब झाला नाही.
दरम्यान, आशिया कप फायनलबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अंतिम सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही, असे आशियाई क्रिकेट परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पावसामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर दोन्ही संघांना विजेते घोषित केले जाईल आणि ट्रॉफी दोघांना दिल्या जाईल.
आशिया कपचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. राखीव दिवस नसल्यामुळे पावसाळ्यात श्रीलंकेत सामने आयोजित करण्यावर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. पावसामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच सांगितले आहे. पावसाळी हंगामामुळे श्रीलंकेऐवजी यूएईमध्ये सामने आयोजित करायचे असल्याचे पीसीबीचे म्हणणे होते. पण ACC अध्यक्ष जय शाह यांनी UAE ऐवजी श्रीलंकेचा पर्याय निवडला.
हा संपूर्ण वाद आशिया कपच्या यजमानपदावरून सुरू झाला होता. यंदा आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे होता. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला. यानंतर होस्टिंगबाबत नवीन पर्याय हायब्रीड मॉडेल आला.
या मॉडेल अंतर्गत पाकिस्तानमध्ये चार सामने आयोजित केले जात आहेत आणि उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत. मात्र, भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. अंतिम सामनाही श्रीलंकेत होणार आहे. मात्र पावसाच्या संकटामुळे आता फायनलबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.