Asia Cup 2023 IND Vs BAN : आशिया कप 2023 च्या सुपर 4 मधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा 6 धावांनी पारभव केला. बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संघ 259 धावात ऑल आऊट झाला.
भारताकडून शुभमन गिलने झुंजार 121 धावांची शतकी खेळी केली. तर अक्षर पटेलने 42 धावांची खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला.
भारताने बांगलादेशला सुरूवातीला धक्के दिले. मात्र त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसनने 80 धावा करत डाव सावरला. यानंतर तोहिदने 54 धावा तर तळातील फलंदाज नसुम अहमदने 44 धावा करत भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या.
शुभमन गिल झुंजार शतकी खेळीनंतर बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांनी बांगलादेशने ठेवलेले 266 धावांचे आव्हान पार करण्यासाठी झुंजार फलंदाजी केली. अक्षरने आक्रमक खेळी करत सामन्यात रंगत निर्माण केली. 18 चेंडूत विजयासाठी 31 धावांची गरज असताना अक्षरने मेहदी हसनच्या षटकात 14 धावा केल्या.
एका बाजूने भारताची फलंदाजी ढासळत असताना शुभमन गिलने एका बाजूने किल्ला लढवत ठेवला. त्याने शतक ठोकत भारताला 200 च्या जवळ पोहचवले. मात्र इशान किशन (5) सूर्यकुमार यादव (26) आणि रविंद्र जडेजा (7) यांनी त्याची साथ लवकर सोडली.
भारताची अवस्था 2 बाद 17 अशी झाली असताना शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी डाव सावरत भारताला 74 धावांपर्यंत पोहचवले. मात्र मेहदी हसनने केएलला 19 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. गिलने केएल सोबत 57 धावांची भागीदारी रचली होती.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्याला तंझीम हसन साकिबने बाद केले.
शाकिब अल हसन आणि तोहीद हिरीदोय यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. या जोरावर बांगलादेशने 33 षटकात 160 धावांपर्यंत मजल मारली. मात्र ही 80 धाजोडी शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने 80 धावांवर खेळत असणाऱ्या शाकिबचा त्रिफळा उडवला.
बांगलेशचा कर्णधार शाकिब अल हसनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. याच्या जोरावर बांगलादेशने 27 षटकात 4 बाद 125 धावा केल्या.
बांगलादेशची पडझड रोखत डाव सावरणारी शाकिब अन् मेहदी हसनची जोडी अखेर अक्षर पटेलने फोडली. त्याने मेहदी हसनला 13 धावांवर रोहित शर्मा करवी झेलबाद करत बांगलादेशला चौथा धक्का दिला.
भारताचा शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने बांगलादेशचे पहिले तीन फलंदाज 28 धावात गारद केल्यानंतर कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसनने डाव सावरत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली.
शार्दुल ठाकूरने अनामुल हकला 4 धावांवर बाद करत बांगलादेशला तिसरा धक्का दिला.
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करताना पहिल्या तीन षटकातच दोन धक्के दिले. बऱ्याच काळानंतर पहिला सामना खेळणाऱ्या मोहम्मद शमीने पहिला धक्का दिला. त्याने लिटन दासचा शुन्यावर त्रिफळा उडवला. यानंतर शार्दुल ठाकूरने सलामीवीर तंझीद हसनला 13 धावांवर बाद केले.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहितने प्लेइंग-11 मध्ये पाच बदल केले आहेत. वर्ल्ड कप आणि खेळाडूंवर कामाचा ताण आणि दुखापतीची भीती लक्षात घेऊन रोहितने हा निर्णय घेतला.
आशिया कपचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
आतापर्यंत या स्पर्धेत तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळालेली नाही. तर श्रेयस अय्यर दोन सामन्यांनंतर बाहेर गेला होता. या तिघांना आज प्लेइंग-11 मध्ये संधी मिळते की नाही हे थोड्यावेळात कळलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.