Asia Cup 2023 : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने सोमवारी पल्लेकेले स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला. यासह भारताने आशिया कप-2023 च्या सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.
या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी केली आणि 48.2 षटकात 230 धावा केल्या. भारताच्या डावाची केवळ 2.1 षटके पूर्ण झाली तेव्हा पाऊस आला आणि त्यानंतर टीम इंडियाला 23 षटकांत 145 धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारताने हे लक्ष्य 20.1 षटकात पूर्ण केले.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद 74 धावांची खेळी केली. त्याचवेळी त्याचा सलामीचा जोडीदार शुभमन गिलने नाबाद 67 धावा केल्या. यासोबत भारत आणि पाकिस्तानचे सुपरफॉरमध्ये स्थान निश्चित झाले आहे.
अ गटातून पाकिस्तानने पहिले स्थान पटकावले आणि दुसरे स्थान मिळवून भारत सुपर फोरसाठी पात्र ठरला. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा सुपर फोरमध्ये पोहोचण्याचा मार्ग अद्याप खुला आहे.
6 सप्टेंबरपासून सुपर फोर फेरी सुरू होणार आहे. 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर नेपाळच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या कुशल भुरटेलने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. भारतीय संघाने पहिल्या दोन षटकांत दोघांचे सोपे झेलही सोडले.
कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांच्यात पहिल्या विकेटसाठी 59 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली. नेपाळच्या संघाला 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरने कुसल भुर्तेलच्या रूपात नेपाळाला पहिला धक्का दिला जो 38 धावा करून बाद झाला.
65 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर नेपाळकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला भीम शार्की फार काळ टिकू शकला नाही. तो रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. नेपाळ संघाला लवकरच तिसरा झटका कर्णधार रोहित पौडेलच्या रूपाने 93 धावांवर बसला जो केवळ 5 धावा करू शकला.जडेजाने लवकरच कुसल मल्लाला पॅव्हेलियनमध्ये पाठवून नेपाळ संघाची धावसंख्या 4 गडी बाद 101 अशी केली.
येथून आसिफ शेख आणि गुलशन झा यांच्यात पाचव्या विकेटसाठी छोटीशी 48 चेंडूत 31 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आसिफ वैयक्तिक 58 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद सिराजचा बळी ठरलेल्या गुलशन झाच्या रूपाने नेपाळ संघाने 144 धावांवर आपली सहावी विकेट गमावली.
मग सातव्या विकेटसाठी सोमपाल कामी आणि दीपेंद्र सिंग अरी यांच्यात 56 चेंडूत 50 धावांची भागीदारी झाली. नेपाळला 194 धावांवर सातवा धक्का बसला. यानंतर सोमपालने एका टोकाकडून धावा काढण्याचा वेग कायम ठेवत धावसंख्या 200 च्या पुढे नेली. भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने 3-3 बळी घेतले. तर शमी, हार्दिक आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.