क्रीडा

IND vs PAK Asia Cup 2023 : शतक हुकलं पण भावांनी मन जिंकले! पाकिस्तानी गोलंदाजासमोर टॉप ऑर्डरनी टाकल्या नांग्या

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 IND vs PAK : आशिया कप 2023च्या हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी भिडला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अपेक्षेप्रमाणे हा निर्णय अत्यंत वाईट ठरला आणि टीम इंडियाने अवघ्या 10 षटकांत 3 विकेट गमावल्या.

येथून इशान किशन आणि हार्दिक पंड्याने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत डाव सांभाळला. पाकिस्तानकडून या सामन्यात शाहीन आफ्रिदीने 4 तर नसीम शाह आणि हरिस रौफने 3-3 विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने 266 धावा केल्या आहेत.

'हिटमॅन' रोहित आणि विराट कोहली दोघेही पाकिस्तानचा घातक डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी समोर सपशेल अपयशी ठरले. या सामन्याच्या पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहीनने रोहित शर्माला आतल्या चेंडूवर बोल्ड केले. असेच काहीसे सामन्याच्या 7व्या षटकात घडलं आणि कोहली आऊट झाला. रोहितने 22 चेंडूत 11 धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले. तर कोहलीने 7 चेंडूत 4 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात रोहित आणि कोहलीला बाद करणारा शाहीन हा पहिला गोलंदाज आहे.

दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर भारताला तिसरा धक्का बसला. हरिस रौफने श्रेयस अय्यरला बाद केले. नऊ चेंडूत 14 धावा करून अय्यरने झेलबाद झाला. त्याने 15व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. त्याने 32 चेंडूत 10 धावा केल्या.

भारतीय संघाने अवघ्या 66 धावांत आपले चार आघाडीचे फलंदाज गमावले. यानंतर पंड्या आणि किशन मैदानात आले आणि त्यांनी हुशारीने फलंदाजीला सुरुवात केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये 138 धावांची शतकी भागीदारीही झाली. संघाच्या एकूण 37.3 षटकात 204 धावांवर किशन बाद झाला.

इशान किशनचे शतक हुकले आणि तो 81 चेंडूत 82 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. हारिस रौफच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो बाबर आझमकडे झेल देऊन बाद झाला. हार्दिक पांड्या 87 धावांवर शाहीन आफ्रिदीचा बळी ठरला. यानंतर जसप्रीत बुमराहने 16 चेंडूंचे योगदान दिले. या सामन्यात भारतीय संघाचा डाव 48.5 षटकात 266 धावांवर आटोपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT