Ishan Kishan And KL Rahul 
क्रीडा

Team India : पाकिस्तानविरुद्ध इशान किशनचं दमदार अर्धशतक, KL राहुलचा पत्ता कट?

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Ishan Kishan And KL Rahul : आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक शानदार सामना खेळला गेला, ज्यामध्ये पावसाने खेळ खंडोबा केला आहे आणि सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशानने सर्वांची मने जिंकली. केएल राहुलच्या अनुपस्थितीत इशानला पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी देण्यात आली होती, दमदार अर्धशतक ठोकत त्या संधीचे त्याने सोने केले. इशानची ही खेळी केएल राहुलसाठी धोक्याची ठरू शकते.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या इशान किशनने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. इशान अत्यंत कठीण काळात फलंदाजीसाठी आला. 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर श्रेयस अय्यरच्या रूपात भारताने तिसरी विकेट गमावली, त्यानंतर इशान फलंदाजीसाठी मैदानात आला.

इशानने अत्यंत समजूतदारपणाने टीम इंडियाचा डाव सावरत पुढे नेला. यादरम्यान दुसऱ्या टोकाला असलेल्या हार्दिक पांड्याने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि दोघांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. आपल्या आक्रमक वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या इशान किशनने हळूहळू आपला डाव पुढे नेत आपण अशा परिस्थितीतही फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिले. इशानने ते काम पाचव्या क्रमांकावर केले, ज्यासाठी केएल राहुल टॉपर मानला जात होता.

केएल राहुलचा पत्ता कट?

पाकिस्तानविरुद्ध इशान किशनची दमदार खेळी केएल राहुलला नक्कीच अडचणीत आणेल. पाकिस्तानसारख्या मजबूत गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध चांगला खेळ दाखवून, इशानने आगामी 2023 मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी यष्टिरक्षक म्हणून दावा केला आहे. केएल राहुलला यष्टिरक्षक म्हणून वर्ल्ड कपसाठी पहिली पसंती आहे.

पण पाकिस्तानविरुद्ध इशानची शानदार खेळी निवडकर्त्यांना नक्कीच विचार करायला लावेल. दुसरीकडे, केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर तो दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर आहे. अशा स्थितीत त्याच्या लय आणि मॅच फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे.

राहुलचा आशिया कप संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र तो पहिले दोन सामने खेळू शकणार नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत 5 सप्टेंबरला वर्ल्ड कप 2023 साठी संघाची घोषणा करेल. अशा परिस्थितीत मुख्य यष्टिरक्षक म्हणून इशान किशनला विश्वचषक संघात संधी मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT