Asia Cup 2023 IND Vs PAK Score  
क्रीडा

Asia Cup 2023 IND Vs PAK Score : पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द! चाहत्यांच्या अपेक्षांवर धो-धो पाऊस...

Kiran Mahanavar

India Vs Pakistan Asia Cup 2023 Cricket Score Today : आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आले होते. पण पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कपमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचे आघाडीचे चार फलंदाज अपयशी ठरले.

इशान किशनने 82 धावांची तर हार्दिक पंड्याने 87 धावांची खेळी खेळून संघाला संकटातून बाहेर काढले. पण टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. 48.5 षटकांत 266 धावांवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी 267 धावांचे लक्ष्य मिळाले होते.

यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले.

Asia Cup 2023 IND Vs PAK Score : पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द!

20 षटकांचा असू शकतो पाकिस्तानचा डाव, काय आहे DLS समीकरण?

कॅंडीमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे, मैदानावर कव्हर आहेत. अशा परिस्थितीत, ओव्हर-कटिंग होणार आहेत. पाकिस्तानला 20 षटकेही खेळायला मिळू शकतात. भारतीय वेळेनुसार रात्री 10.27 पर्यंत सामना सुरू झाला नाही, तर पाकिस्तानला 20 षटके खेळायला मिळतील. अशा स्थितीत त्यांच्यासमोर 155 धावांचे लक्ष्य असेल.

पाऊस थांबला! अंपायर काय घेणार निर्णय?, पाकिस्तानसाठी हे आहे DLS समीकरण

चांगली बाब म्हणजे पाऊस थांबला असून मैदान कोरडे करण्याचे काम सुरू आहे. काही वेळानंतर पंच मैदान आणि खेळपट्टीची पाहणी करतील. त्यानंतर पाकिस्तानचा डाव कधी सुरू होईल. जर षटके कमी केली तर पाकिस्तानला 45 षटकांत 254, 40 षटकांत 239, 30 षटकांत 203 आणि 20 षटकांत 155 धावांचे लक्ष्य मिळेल.

लंकेत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात 

पावसाने पुन्हा सामन्यात व्यत्यय आणला आहे. भारताच्या डावानंतर पाऊस सुरू झाला. मैदानावरील खेळाडूंनी खेळपट्टी कव्हर्सने झाकली आहे. पाकिस्तानचा डाव अजून सुरू झालेला नाही.

भारताने पाकिस्तानला दिले 267 धावांचे लक्ष्य! हार्दिक-इशानचे अर्धशतक तर आफ्रिदीचा विकेटचा चौकार

आशिया कप मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 48.5 षटकात 266 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 87 धावांची खेळी खेळली. डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशननेही भारतीय चाहत्यांची मने जिंकली आणि पाकिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात 82 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही.

भारताला आठवा धक्का

भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. 45व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नसीम शाहने शार्दुलला झेलबाद केले. शार्दुलने केवळ तीन धावा केल्या. भारताची धावसंख्या आठ गडी बाद 243 आहे. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव क्रीजवर आहेत.

भारताला आणखी एक धक्का

शाहीन आफ्रिदीने भारताला आणखी एक धक्का दिला आहे. शाहीनने रवींद्र जडेजाला यष्टिरक्षक रिझवानकडे झेलबाद केले. जडेजाने 22 चेंडूत 14 धावा केल्या.

भारताला मोठा धक्का, हार्दिक पांड्याचे शतक हुकले

सामन्याच्या महत्त्वाच्या वेळी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. 44व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्या शाहीन आफ्रिदीचा बळी ठरला. हार्दिकला वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावण्याची संधी होती, मात्र तो 87 धावा करून बाद झाला. त्याने ९० चेंडूंचा सामना केला. हार्दिकच्या फलंदाजाला सात चौकार लागले. त्याने षटकारही मारला.

संकटमोचक इशान किशन आऊट! टीम इंडियाला बसला पाचवा धक्का

भारतीय संघाचा निम्मा संघ 204 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. इशान किशनचे शतक हुकले आणि तो 81 चेंडूत 82 धावा करून बाद झाला.

इशान किशन अन् हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी बनले संकटमोचक!

इशान किशननंतर हार्दिक पांड्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडेतील 11 वे अर्धशतक आहे. त्याने 34व्या षटकात चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने 34 षटकात 4 विकेट गमावत 178 धावा केल्या आहेत. इशान किशन नाबाद 72 आणि हार्दिक पंड्या नाबाद 50 धावांवर खेळत आहेत.

पाकिस्तानविरुद्ध इशानने ठोकले पहिले अर्धशतक! पांड्याने सांभाळली संघाची धुरा

इशान किशनने शानदार अर्धशतक झळकावत भारताला संकटातून बाहेर काढले. 29व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. हा त्याचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना होता आणि त्याने तो संस्मरणीय बनवला.

एवढेच नाही तर त्याने प्रथमच वनडेमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. भारताने 29 षटकात 4 विकेट गमावत 147 धावा केल्या आहेत. इशान किशन 55 आणि हार्दिक पंड्या 37 धावांवर नाबाद आहे.

IND Vs PAK Live Score : पावसानंतर अचानक कडक ऊन अन् भारताला मोठा धक्का!

शुभमन गिल 32 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. हरिस रौफने त्याला बाद केले. यासह भारताची चौथी विकेट पडली.

IND Vs PAK Live Score : पावसामुळे पुन्हा थांबला भारत-पाकिस्तान सामना! टीम इंडिया बॅकफूट

पावसाने पुन्हा सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे दुसऱ्यांदा सामना थांबवण्यात आला आहे. भारताने 11.2 षटकात तीन विकेट गमावत 51 धावा केल्या आहेत. शुभमन गिलसोबत इशान किशन नाबाद आहे. गिलने 24 चेंडूत सहा आणि ईशानने सहा चेंडूत दोन धावा केल्या.

IND Vs PAK Live Score : लंकेत पाकिस्तानचा तांडव! भारतीय संघ बॅकफूट, 49 धावांत 3 खेळाडू तंबूत

भारताला तिसरा धक्का बसला आहे, श्रेयस अय्यर 9 चेंडूत 14 धावा केल्यानंतर हारिस रौफच्या चेंडूवर झेलबाद झाला. भारत पूर्णपणे बॅकफूटवर आहे. आता इशान किशन क्रीझवर आला आहे.

लंकेत शाहीन आफ्रिदीचा कहर! रोहितपाठोपाठ कोहलीही क्लीन बोल्ड

सातव्या षटकात 27 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला आहे. लंकेत शाहीन आफ्रिदीचा कहर पाहिला मिळत आहे. रोहित शर्मानंतर त्याने विराट कोहलीला बाद केले. विराटला सात चेंडूत चार धावा करता आल्या. त्याचवेळी रोहितला 22 चेंडूत 11 धावा करता आल्या. शाहीनने सलग दोन षटकांत भारताच्या दोन प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

IND Vs PAK Live Score : पाऊस थांबल्यानंतर भारताला मोठा धक्का! कर्णधार रोहित तंबूत

कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. 22 चेंडूत 11 धावा करून तो शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. विराट कोहली क्रीझवर आला आहे.

पाऊस थांबला! थोड्यावेळात सुरू होणार सामना

कॅंडीमध्ये पाऊस थांबला आहे. खेळपट्टी आणि मैदानावरून कव्हर काढले जात आहेत. सामना लवकरच सुरू होऊ शकतो.

4.2 षटकांनंतर पावसामुळे थांबला खेळ! शुभमन अजून उघडू शकला नाही खाते

पहिल्या डावातील 4.2 षटकांनंतर मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला. संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकण्यात आले आहे. आज मुसळधार पावसाची शक्यता होती. अशा परिस्थितीत आता निसर्गाने आपला खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. शुभमन गिल अजून खाते उघडू शकला नाही. भारताने एकही विकेट न गमावता 15 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल करणार सलामी

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारताची सलामी देणार आहेत. टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी या दोन्ही खेळाडूंवर आहे.

ही आहे भारत आणि पाकिस्तानची प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : फखर जमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

भारताने नाणेफेक जिंकून घेतला हा निर्णय!

भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कपमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह वनडे प्लेइंग-11 मध्ये परतले आहेत. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि कुलदीप चहल हे दोन फिरकीपटू म्हणून संघात आहेत.

पाकिस्तानने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

कँडीत पाऊस थांबला, किती वाजता सुरू होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना?

क्रिकेट रसिकांवर सूर्यनारायण प्रसन्न झाला आहे. कँडीचे आकाश निरभ्र झाले असून सूर्याचे दर्शन झाल्याने भारत-पाकिस्तान सामन्याची नाणेफेक ठरल्या वेळेनुसारच होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT