Asia Cup 2023 IND vs PAK Reserve Day Colombo Weather Update 
क्रीडा

Asia Cup 2023 Ind Vs Pak : 'रिझर्व्ह डे' चा फायदा नाहीच? भारत-पाकिस्तान सामन्यावर 'हा' मोठा धोका

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 IND vs PAK Reserve Day Colombo Weather Update : ज्या भीतीने आशिया कपच्या आयोजकांनी भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला होता. ती भीती खरी ठरली. सुपर फोरमधील भारत-पाकिस्तान सामना नियोजित दिवशी म्हणजे रविवारी 10 सप्टेंबरला हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आता हा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी खेळवला जाणार आहे.

टीम इंडियाच्या सध्या 2 बाद 147 धावा आहे. विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांसह खेळत आहे. आज हा सामना पुन्हा एकदा पूर्ण 50 षटकांचा खेळवला जाईल. मात्र या सामन्यावर संकटाचे ढग अजूनही दाटून आले आहेत.

सोमवारी पावसाची स्थिती कशी असेल?

भारत-पाकिस्तान सामन्यात खरं तर 'रिझर्व्ह डे'चा काही फायदा होणार नाही, कारण Accuweather नुसार, आज पावसाची 99 टक्के शक्यता आहे. तर Weather.com पावसाची 90 टक्के शक्यता दाखवते. Accuweather दिवसभरात पावसाची 99 शक्यता आणि जोरदार वारे आणि वादळाची 59 टक्के शक्यता दाखवत आहे. संध्याकाळी पावसाची शक्यता 77 टक्क्यांपर्यंत कमी होते पण त्यात व्यत्यय येणार नाही याची शाश्वती नाही.

सामना झाला नाही तर?

राखीव दिवसही पावसामुळे वाहून गेला, तर दोन्ही संघ प्रत्येकी एक गुण शेअर करतील आणि पाकिस्तान आशिया कप फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या एक पाऊल जवळ जाईल. 12 सप्टेंबरला टीम इंडियाला सुपर 4 मधील दुसरा सामना खेळायचा आहे, ज्यात त्यांचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

म्हणजेच आता टीम इंडियाला सलग तीन दिवस खेळावे लागणार आहे. भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतीनंतर परतले आहे, त्यामुळे हे अधिक कठीण होते. हार्दिक पांड्या वर्कलोड मॅनेजमेंटवर सतत काम करतो. अशा स्थितीत सलग तीन दिवस खेळल्यास भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात, अशी शंका व्यक्त होत आहे.

टीम इंडियाची शानदार सुरुवात

टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात शानदार सुरुवात केली. या सामन्यात रोहित शर्मा 56 धावा करून बाद झाला. तर गिलने 58 धावांची खेळी केली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT