Asia Cup 2023 IND Vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2023 च्या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला नाही तर का होईल, हा मोठा प्रश्न होता.
कारण हा सामना 10 सप्टेंबरला होणार आहे आणि या दिवशी कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पुढील दोन आठवडे कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन ACC ने राखवी दिवशीचा निर्णय घेण्याची योजना आखली.
जर 10 सप्टेंबरला पावसाने या सामन्यात अडथळा आणला तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबरला पूर्ण होईल. सुपर-4 मधील या सामन्यासाठीच राखीव दिवस जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय आशिया कप फायनलसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.
Accuweather वेबसाइटनुसार, सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता 90 टक्के आहे. रात्री वादळाचीही शक्यता आहे. दिवसाच्या तुलनेत रात्री पावसाचा जोर वाढू शकतो. त्याची शक्यता 96 टक्क्यांपर्यंत आहे. रात्रभर ढगाळ राहण्याची शक्यता 98 टक्के आहे. Weather.com ने देखील पावसाची 90 टक्के शक्यता वर्तवली आहे.
राखवी दिवशीही मुसळधार पावसाची शक्यता आहे, जर राखीव दिवशीही पाऊस पडला तर सुपर 4 मध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता आहे. राखीव दिवशीही निकाल लागला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागेल.
आशिया कपच्या साखळी फेरीतील भारत-पाकिस्तान सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यात भारताने फलंदाजी केली होती, मात्र पाकिस्तानच्या फलंदाजीपूर्वीच इतका जोरदार पाऊस पडला आणि सामनाच रद्द करावा लागला.
तसे, असाही प्रश्न पडतो की भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असेल तर इतर संघांचे काय? श्रीलंका आणि बांगलादेशचे संघही सुपर-4 मध्ये पोहोचले आहेत. या संघाला 9 सप्टेंबरला कोलंबोमध्ये सामना खेळायचा आहे आणि या दिवशीही मुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. अशा परिस्थितीत या दोन्ही संघांची क्रिकेट संघटना हे प्रकरण उचलू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.