Asia Cup 2023 moved from Pakistan to Sri Lanka  
क्रीडा

Asia Cup 2023: जय शहाने केला गेम! पाकिस्तानकडून यजमानपद घेतलं काढून, या देशात होणार स्पर्धा?

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 moved from Pakistan to Sri Lanka : आशिया कप 2023 कुठे खेळायचा यावरून बराच काळ वाद सुरू होता. ज्यावर आता या निर्णयाच्या बातम्या समोर येत आहेत. बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही भारताच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याचे सोमवारी दुपारी कळले.

काही दिवसांपूर्वी असे बोलले जात होते की जर पाकिस्तानने मायदेशात स्पर्धा आयोजित करण्यावर ठाम राहिले तर ती रद्द केली जाईल. मात्र आता या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे. या स्पर्धेचे यजमानपद सध्यातरी पाकिस्तानकडून हिसकावून नवीन देशाकडे सोपवण्यात आले आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आशिया कप 2023 आता पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत हलवण्यात आला आहे. या वृत्तात असेही म्हटले आहे की, पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत सध्या तरी निर्णय झालेला नाही. पाकिस्तानही या स्पर्धेवर बहिष्कार घालू शकतो.

आशिया कप यावेळी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, त्याचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही.

अहवालात असेही समोर आले आहे की, जर आशिया कप 2023 श्रीलंकेत गेला तर तो डंबुला आणि पल्लेकेले येथे आयोजित केला जाऊ शकतो. कोलंबोमध्ये सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा हंगाम असतो. त्यामुळे ही दोन शहरे फायनल होऊ शकतात.

दुसरीकडे पाकिस्तान आला तर सहा देशांची स्पर्धा होईल. अन्यथा ते भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांच्यात असू शकते. पाकिस्तानने या स्पर्धेवर बहिष्कार घातला तर 2023 च्या विश्वचषकाबाबतही सस्पेंस निर्माण होऊ शकतो.

संपूर्ण प्रकरण पाकिस्तानला स्पर्धेचे आयोजन करायचे होते. त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-20 विश्वचषक 2022 दरम्यान पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. यानंतर वाद वाढला. पीसीबीचे तत्कालीन प्रमुख रमीझ राजा यांनीही 2023च्या वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात न येण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये सत्तापरिवर्तन झाले आणि नजम सेठी आले. तटस्थ ठिकाणी ही स्पर्धा होऊ नये यासाठीही त्यांनी आग्रह धरला. यानंतर पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलबद्दल बोलले, ज्या अंतर्गत भारताविरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी आणि उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होत्या. हे देखील आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) फेटाळले होते. इथून वाद वाढला.

पाकिस्तानने ही स्पर्धा आपल्या घरी आयोजित करण्याचा निर्धार केला होता. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणांमुळे आणि राजकीय मतभेदांमुळे भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करू शकत नाही. त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

भारतीय बोर्डानेही पाच देशांदरम्यान एकदिवसीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. आता आलेल्या अहवालानुसार पाकिस्तान बहिष्कार घालू शकतो. म्हणजेच या स्पर्धेत फक्त पाच देश सहभागी होऊ शकतात. सध्या याबाबत बोर्ड आणि एसीसी या दोघांकडूनही घोषणेची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT