PCB issues show-cause notice to Pakistani cricketers playing in the USA 
क्रीडा

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! PCB ने 15 हून अधिक खेळाडूंना बजावली नोटीस

जाणून घ्या कारण

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Pakistan Cricketers : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. 30 ऑगस्टपासून आशिया कपचा थरार रंगणार आहे त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही संघाची घोषणा केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील टी-20 लीगमध्ये सहभागी झालेल्या 15 हून अधिक खेळाडूंना बोर्डाने नोटीस पाठवली आहे. या खेळाडूंनी बोर्डाकडून एनओसी न घेताच स्पर्धेत सहभागी घेतला होता, यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश आहे.

क्रिकेट पाकिस्तानच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एनओसीशिवाय अमेरिकेत उतरलेल्या खेळाडूंना नोटीस पाठवली आहे. काही खेळाडूंनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत त्यांना एनओसी घेण्याची गरज नाही.

मात्र, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांनी खेळाडूंकडून नागरिकत्वाची कागदपत्रे मागितली, जेणेकरून राष्ट्रीय संघात किंवा देशांतर्गत संघातील त्यांचे भवितव्य ठरवता येईल. अद्याप या खेळाडूंनी याबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही.

सोहेब मकसूद, अर्शद इक्बाल, अरिश अली, हुसैन तलत, अली शफीक, इमाद बट, उस्मान शेनवारी, उम्मेद आसिफ, झीशान अश्रफ, सैफ बदर, मुख्तार अहमद आणि नौमन अन्वर यांनी अलीकडील ह्यूस्टन ओपन स्पर्धेदरम्यान पीसीबीकडून एनओसी घेतली नाही. त्याचप्रमाणे सलमान अर्शद, मुस्सादिक अहमद, इम्रान खान ज्युनियर, अली नासिर आणि हुसैन तलत यांनीही सध्या सुरू असलेल्या मायनर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची परवानगी घेतली नाही.

दुसरीकडे, फवाद आलम, हसन खान, आसिफ मेहमूद, मीर हमजा, शरजील खान आणि अन्वर अली यांनी पीसीबीकडून एनओसी घेतली. पीसीबीने परदेशी लीगमध्ये सहभागी होण्यापूर्वी एनओसी मिळविण्यासाठी $10,000 म्हणजेच सुमारे 8.5 लाख रुपयांची अट घातली होती. ही रक्कम खेळाडूला नाही तर त्याच्या संघाला द्यायची आहे.

जर एखाद्या संघाने एका खेळाडूसाठी परवानगी घेतली आणि नंतर त्यांनी दुसर्‍या खेळाडूवर स्वाक्षरी केली तर त्यांना अतिरिक्त 8.5 लाख रुपये द्यावे लागतील. पीसीबीने ह्यूस्टन ओपनसाठी संघांकडून एनओसीसाठी शुल्क आकारले, परंतु खेळाडूंच्या विनंतीनंतर, त्यांना कोणत्याही पैशाशिवाय लहान लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT