Asia Cup 2023 Team India Squad : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी 19 जुलै रोजी आशिया कप 2023 चे वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धचा थरार येत्या 30 ऑगस्टपासून रंगणार आहे. पाकिस्तानमध्ये चार आणि श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे.
भारत अ गटात आहे आणि त्याच्यासोबत पाकिस्तान आणि नेपाळही आहेत. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. तेथून दोन संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघाने आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीच्या चिंतेने अद्याप संघ जाहीर केलेला नाही.
आता आशिया कपचे सूत्र दिल्लीतून हलणार आहेत, कारण अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीची सोमवारी (21 ऑगस्ट) दिल्लीत बैठक होणार आहे. कर्णधार रोहित शर्माही निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. संघनिवडीला उशीर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी आहेत. त्यातील काही खेळाडू हळूहळू पुनरागमन करत आहेत.
भारतीय संघातील तीन प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होते. राहुल सध्या सराव करत आहे आणि पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. आता त्याची संघात निवड होते की नाही हे पाहावे लागेल. श्रेयस अय्यरच्या फिटनेसवर अजूनही शंका आहे. अय्यरने फलंदाजीचा सरावही केला, मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाही.
बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केले. या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या टी-20 मध्ये बुमराहने शानदार गोलंदाजी करत दोन विकेट घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.