Asia Cup 2023 sakal
क्रीडा

Asia Cup 2023 : चाहत्यांची प्रतीक्षा संपली! आशिया कपच्या शेड्यूलबद्दल मोठी अपडेट

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Schedule : आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप 2023 चे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. पाकिस्तानचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाईल. आशिया कप स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

आशिया कपच्या शेड्यूलबद्दल मोठी अपडेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 ते 16 जुलै दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत आशिया चषकाचे वेळापत्रक अंतिम केले जाईल. द डॉनच्या वृत्तानुसार, आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या नेतृत्वाखाली एसीसीही बैठक घेणार आहे.

या दिवशी होऊ शकतो भारत-पाकिस्तान सामना!

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान 3 सामने होऊ शकतात. दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. आशिया कप 2023 च्या वेळापत्रकाचा मसुदा सर्व संघांना पाठवण्यात आला आहे. या मसुद्याच्या वेळापत्रकानुसार, साखळी टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना 3 सप्टेंबर रोजी होऊ शकतो. हा सामना श्रीलंकेच्या डंबुला येथे खेळल्या जाऊ शकतो.

6 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार

आशिया कप 2023 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ मैदानात उतरले आहेत. नेपाळचा संघ प्रथमच या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेतील फक्त 4 सामने पाकिस्तानला खेळवले जाणार आहेत. अंतिम सामन्यासह उर्वरित 9 सामने श्रीलंकेच्या यजमानपदी खेळवले जातील.

टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. लीग टप्पा सुपर-4 आणि फायनल असे एकूण 13 सामने खेळवले जातील. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या संघांना एका गटात ठेवण्यात आले आहे, तर गतविजेत्या श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश दुसऱ्या गटात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kankavli Politics : नीतेश राणेंविरोधात 'मविआ' कोणाला उतरविणार रिंगणात; उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, 'ही' नावं चर्चेत

Latest Maharashtra News Updates : Canada Politics Live: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्याच लोकांनी घेरले

Chutney Store Tips: घरी बनवलेल्या चटण्या दिर्घकाळ राहतील चांगल्या, फक्त 'या' टिप्स करा फॉलो

Aadhaar Update : आधार कार्डवरील ही माहिती कधीच बदलू नका; अपडेट करताना घ्या काळजी,नाहीतर होईल पश्चाताप

Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, निफ्टी 24,500 च्या खाली

SCROLL FOR NEXT