What did Indian batsmen do at nets to prepare for Shaheen Afridi 
क्रीडा

Asia Cup 2023 : शाहीन आफ्रिदीच्या स्विंगवर हेड कोच द्रविडने काढला तोडगा? सरावात आखली अनोखी रणनीती

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 : आशिया कप 2023च्या पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा सामना करताना भारतीय संघाच्या फलंदाजांना घाम फोटला. आता सुपर-4 मध्ये भारताला आपला पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.

अशा परिस्थितीत टीम इंडियाला पुन्हा अडचणींचा सामना करावा लागणार आहे, यात शंका नाही. पण टीम इंडिया आता पाक गोलंदाजाना कसे सामोरे जायचे याची तयारी करत आहे. गुरुवारी पावसामुळे टीम इंडियाने इनडोअर सराव केला. या सरावात भारतीय फलंदाज शाहीनला सामोरे जाण्यासाठी खास तयारी करताना दिसले.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली या सरावात सहभागी झाले नाहीत. पण शुभमन गिल, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी सराव केला. दुखापतीतून परतल्यानंतर राहुलने पहिल्यांदाच टीम इंडियासोबत सराव केला.(Cricket News in Marathi)

पण यावेळी टीम इंडियाच्या सरावात थ्रोडाउन विशेषज्ञ नुवान सेनेविरत्ने आणि दुसरे डेटा विश्लेषक हरी प्रसाद मोहन होते. या सराव सत्रात टीम इंडियाने डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांना सामोरे जाण्याची तयारी केली. सरावामध्ये सेनाविरत्नेकडे चेंडू स्विंग करण्याचे खास उपकरण होते. ज्याद्वारे तो चेंडू इनस्विंग करत होता आणि चेंडू बाहेर काढत होता. तर हरी प्रसाद आपल्या टॅबवर भारतीय फलंदाजांचे नियतंत्र रेकॉर्ड करत होते.

गिल, राहुल आणि अय्यर यांनी सेनाविरत्नेसोबत सराव संपताच लगेचच व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. यावेळी, आश्चर्याची गोष्ट म्हणजे संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी त्या सरावादरम्यान सेनावितनेसह भारतीय फलंदाजांकडे फारसे लक्ष दिले नाही.(Cricket News in Marathi)

भारतीय संघाच्या फलंदाजांना डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. हे अनेकवेळा पाहिले आहे. 2019 मधील वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतही न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले होते.

2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने भारताला अडचणीत आणले. तर शाहीनने टी-20 वर्ल्ड कप-2022 मध्ये भारतीय फलंदाजांना आधीच अडचणीत आणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT