Bangladesh Cricket Board 
क्रीडा

Asia Cup 2023 Bangladesh Squad : आशिया कप 2023 साठी 'या' संघाची घोषणा! अनकॅप्ड खेळाडूला मिळाली संधी

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Bangladesh Squad : 30 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धेची 14 वी आवृत्ती सुरू होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आहे, पण या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहेत. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. सुरुवातीच्या लीग टप्प्यासाठी प्रत्येकी तीन संघांना दोन गट अ आणि ब मध्ये विभागण्यात आले आहेत.

अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. त्यामुळे ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ आहेत. बांगलादेशने आता आगामी स्पर्धेसाठी आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात एका अनकॅप्ड खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे.

शुक्रवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघाची कमान शाकिब अल हसनकडे सोपवली. शाकिबकडे जबाबदारी सोपवल्यानंतर शनिवारी सकाळी आगामी आशिया चषकासाठी संघाचा 17 सदस्यीय संघही जाहीर करण्यात आला आहे. या संघात अनकॅप्ड खेळाडू तनजीद हसन तमीमचा समावेश झाला आहे.(Shakib Al Hasan to lead Bangladesh's 17-member squad at the Asia Cup.)

आशिया कप 2023 साठी बांगलादेश संघ -

शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मेहिदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, मेहदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, सफीफुल हुसैन, अफ्रीफ हुसेन. इस्लाम, इबादोत हुसेन, मोहम्मद नईम.

बांगलादेश आशिया कप 2023 वेळापत्रक

  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, 31 ऑगस्ट 2023 (पल्लेकेल)

  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, 3 सप्टेंबर 2023 (लाहोर)

याशिवाय साखळी फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. जिथे प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध तीन सामने खेळायचे आहेत. यानंतर सुपर 4 चे अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Elections: बुलेटची पैज! नेता जिंकेल की नाही यावर कार्यकर्त्यांनी लावली पैज, ५०० रुपयांचा लिहून घेतला बॉण्ड

AUS vs PAK 2nd ODI : 28 वर्षानंतर पाकिस्तान जिंकला! विराटकडून धुलाई झालेला गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला

Latest Maharashtra News Updates : काॅंग्रेसने ओबीसी आणि दलितांना एकमेकांपासून दूर ठेवले, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

TET Exam : परीक्षार्थींचे बायोमेट्रिक, फेस स्कॅन; टीईटी परीक्षेची जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयारी

मालिकांसाठी नाही तर 'या' साठी भारतात परतली मृणाल दुसानिस, पती नीरजने सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT