Asia Cup 2023 Team India Squad sakal
क्रीडा

Asia Cup 2023 Super-4 Schedule : आशिया कपच्या सुपर 4 मध्ये टीम इंडिया कधी कोणाशी भिडणार, जाणून घ्या शेड्यूल

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Super Four Schedule Team India : अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ आशियाई करंडकातील सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरण्यापासून थोडक्यासाठी दूर राहिला. श्रीलंकेकडून मिळालेल्या २९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानला सुपर फोर फेरीत पात्र ठरण्यासाठी ३७.१ षटकात लक्ष्य ओलांडणे गरजेचे होते.

पण ३७.४ षटकांत त्यांचा डाव २८९ धावांवरच आटोपला. श्रीलंकेने दोन धावांनी निसटता विजय मिळवला आणि सुपर फोर फेरीत प्रवेश केला. अ गटातून पाकिस्तान व भारत आणि ब गटातून श्रीलंका व बांगलादेश या देशांनी पुढील फेरीत प्रवेश केला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला नेपाळला पराभूत करावे लागले, जे त्याने सहज केले. मात्र आता सर्वच संघांसाठी ही स्पर्धा चुरशीची झाली आहे. सुपर-4 मध्ये भारताचे वेळापत्रक काय आहे?.

सुपर-4 मध्ये पोहोचलेले सर्व संघ एकमेकांशी सामने खेळतील. म्हणजेच प्रत्येक संघाला येथे तीन सामने खेळावे लागणार आहेत. सुपर-4 मध्ये भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 10 सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. एका दिवसानंतर म्हणजेच 12 सप्टेंबरला भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. भारतीय संघाला 15 सप्टेंबरला बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. या वेळीही पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध जशी मैदाने होती तशीच असेल. म्हणजे तीन चांगले संघ तीन सामन्यांत भारताला टक्कर देतील.

सुपर फोर फेरी

  • ६ सप्टेंबर ः पाकिस्तान - बांगलादेश

  • ९ सप्टेंबर ः बांगलादेश - श्रीलंका

  • १० सप्टेंबर ः भारत - पाकिस्तान

  • १२ सप्टेंबर ः भारत - श्रीलंका

  • १४ सप्टेंबर ः पाकिस्तान - श्रीलंका

  • १५ सप्टेंबर ः भारत - बांगलादेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT