Team India after defeat vs bangladesh Rohit Sharma 
क्रीडा

Team India : वर्ल्डकपच्या तोंडावर बांगलादेशविरुद्धच्या पराभवाने टीम इंडियासमोर उभे केले हे मोठे प्रश्न, रोहित टेन्शनमध्ये

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Team India after defeat vs Bangladesh : कोलंबोमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. बांगलादेशकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. बांगलादेशचा गेल्या 4 एकदिवसीय सामन्यांमधील भारतावरील हा तिसरा विजय आहे.

या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले होते. कर्णधार रोहित शर्माने बेंचवर बसलेल्या खेळाडूला आणले. मात्र वर्ल्डकपच्या तोंडावर बांगलादेशविरुद्धच्या पराभवाने टीम इंडियासमोर अनेक मोठे प्रश्न उभे केले आहेत

सूर्यकुमार यादव काय करायचे?

सूर्यकुमार यादव हा टी-20 मध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे, पण वनडेमध्ये गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. 25 डावांनंतर त्याची सरासरी केवळ 24.40 आहे. तरीही त्याची वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे. चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशविरुद्ध तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. कारकिर्दीतील पहिल्या 6 डावात त्याची सरासरी 65 होती, पण त्यानंतर तो कधीही 40 धावा करू शकला नाही.

जडेजाच्या फलंदाजीवर किती विश्वास ठेवायचा?

रवींद्र जडेजाचा बॅटिंग फॉर्म टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत आहे, पण त्याने शेवटचे अर्धशतक 2020 मध्येच झळकावले. आशिया कपमध्ये तो सपशेल अपयशी ठरला असून वर्ल्ड कपपूर्वी त्याचा फॉर्म संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

गोलंदाजीत अक्षरला नाही सोडता आली छाप!

रवींद्र जडेजा गोलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे, पण फलंदाजीत चांगली कामगिरी करत नाही. अक्षर फलंदाजीत धावा काढत असला तरी गोलंदाजीत त्याला छाप सोडता आली नाही. गेल्या पाच वनडेत त्याच्या नावावर फक्त 3 विकेट आहेत. त्याला एकदाही त्याचे स्पेल पूर्ण करता आले नाही. अक्षरही जवळपास 6 च्या इकॉनॉमीवर धावा देत आहे.

टेलेंडर्सला लवकरात लवकर कसे रोखायचे

बांगलादेशच्या 8, 9 आणि 10 क्रमांकाच्या फलंदाजांनी मिळून 87 धावा केल्या. 193 धावांवर 7 गडी बाद झाल्यानंतर संघाने 265 धावा केल्या. गेल्या सामन्यातही खालच्या फळीतील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले होते. टेलंडर्सना लवकरात लवकर कसे रोखायचे हा भारतीय गोलंदाजांसमोरचा प्रश्न आहे.

फिरकीपटूंविरुद्ध फलंदाज फेल?

फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाज खूप मजबूत मानले जातात. पण श्रीलंकेविरुद्धच्या सर्व 10 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. बांगलादेशच्या चार फिरकीपटूंनी फलंदाजांना खूप त्रास दिला. शेवटच्या षटकातही बांगलादेशी संघ फिरकीपटूंच्या साथीने गोलंदाजी करत होता. त्याच्याविरुद्ध कोणताही भारतीय फलंदाज आक्रमक खेळू शकला नाही. भारतीय फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध का झगडत आहेत, हे कोणालाच समजत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT