Asia Cup 2023 Sanju Samson esakal
क्रीडा

Asia Cup 2023 : आयपीएल स्टारची कारकीर्द संपली? 13 ODI सामन्यात 55.71 च्या सरासरीने धावा तरी रोहित देणार डच्चू?

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 Sanju Samson : पाकिस्तानातील मुल्तान येथे 30 ऑगस्टपासून आशिया कप 2023 ची सुरूवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे 2 सप्टेंबरला एकमेकांना भिडणार आहे.

मोठ्या प्रतिक्षेनंतर आता भारताचा आशिया कपसाठीचा संघ 20 ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. वर्ल्डकप 2023 साठीचा संघ हा नंतर निवडण्यात येईल अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. (ICC ODI World Cup 2023 Team India Squad)

दरम्यान, केरळचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन वर्ल्डकपच्या संघात असणार की नाही अशी चर्चा सुरू आहे. मात्र संजू सॅमसनचे वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे. वेस्ट इंडीजमधील त्याची सुमार कामगिरी पाहता त्याला आशिया कपच्या संघात देखील स्थान मिळण्याची शक्यता नाही.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार संजूने वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी 20 मालिकेत तीन सामन्यात 12, 7, आणि 13 धावा केल्या. याचबरोबर वनडे मालिकेतील दोन सामन्यात 9 आणि 51 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर संजू आशिया कपसाठीच्या 15 जणांच्या संघात स्थान मिळवू शकणार नाही.

संजू नाही तर कोण?

संजू सॅमसनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या 13 सामन्यात 55.71 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र केएल राहुल आता फिट झाला असून तो भारतीय संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. इशान किशन याने देखील पर्यायी खेळाडू म्हणून आपली जागा पक्की केली आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा देखील समावेश होण्याची शक्यता आहे. त्याने भारताकडून आपला शेवटचा सामना हा झिम्बावेविरूद्ध 20 ऑगस्ट 2022 ला खेळला होता. तो पाठीच्या दुखापतीमुळे जवळपास एक वर्ष संघापासून दूर होता. तो जसप्रीत बुमराहसोबत आशिया कपमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रसिद्ध हा आमच्या वेगवान माऱ्याला एक वेगळी दिशा देण्याची क्षमता ठेवतो. तो चांगला वेग आणि बाऊन्स निर्माण करू शकतो. संघनिवडीपूर्वी आयर्लंडविरूद्धच्या टी 20 मालिकेत जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा ही दमदार जोडी खेळताना निवडसमिती पाहू शकते.' बीसीसीआय खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी वेळ घेणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT