Asia Cup 2023 Team India Squad : आशिया कप 2023 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळला जाणार आहे. आशिया कप भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. या स्पर्धेसाठी कधीही भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला या संघात स्थान मिळवता आलेले नाही. एका स्टार खेळाडूने टीम इंडियाच्या संघात यष्टिरक्षक म्हणून पुनरागमन केले आहे.
आशिया कप 2023 साठी टीम इंडियाच्या संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलच्या पुनरागमनानंतर संजू सॅमसनला आशिया कप संघातून वगळण्यात आल्याचे मानले जात आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर संजू सॅमसनला स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी होती, पण त्याने ती गमावली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर संजू सॅमसनने 2 वनडेत केवळ 1 आणि 51 धावा केल्या. संजू सॅमसन वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेनंतर खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत दिसला. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये त्याने 40 धावांची इनिंग खेळली.
या स्पर्धेत राहुल मुख्य यष्टिरक्षक असेल, तर इशान किशनचा बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर संजू सॅमसनला बॅकअप खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले आहे.
आशिया कप 2023 साठी भारताचा 17 सदस्यीय संघ : (Team India Squad)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.