Suryakumar Yadav in Asia Cup 2023 esakal
क्रीडा

Asia Cup 2023: ODI क्रिकेटमध्ये लाजिरवाणा विक्रम... तरी आशिया कपमध्ये एन्ट्री, आता वर्ल्ड कप खेळणार सूर्या?

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav in Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

आयसीसी टी-20 क्रमवारीत नंबर-1वर असलेल्या सूर्यकुमार यादवलाही या संघात स्थान मिळाले आहे. अशा स्थितीत सूर्या वनडे विश्वचषकात खेळणार हे जवळपास निश्चित दिसत आहे. पण सूर्या टी-20 मध्ये नंबर-1 फलंदाज असला तरी वनडेत त्याची बॅट अजून तरी मात्र शांत राहिली आहे.

सूर्याचा एकदिवसीय क्रिकेटमधला एकूण रेकॉर्डही खूपच खराब राहिला आहे. त्याने आतापर्यंत 26 सामने खेळले असून त्याला केवळ 2 अर्धशतके झळकावता आली आहेत. हे सर्व सोडून, ​​त्याचा यंदाचा विक्रमही पाहिला, तर गेल्या 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची सरासरी खूपच खराब आहे. यासोबतच त्याने यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये लाजिरवाणा विश्वविक्रमही केला आहे. एवढे सगळे होऊनही त्याला संघात स्थान मिळाले असेल तर ही चाहत्यांसाठी धक्कादायक बाब आहे.

सूर्यासाठी या वर्षात एकदिवसीय सामने खूपच वाईट गेले आहेत. सूर्याने या वर्षी एकूण 10 एकदिवसीय सामने खेळले, 14.11 च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ 127 धावा केल्या. दरम्यान, सलग 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये तो गोल्डन डकवर बाद झाला आणि त्याने अतिशय लाजिरवाणा विक्रम केला. तीन सामन्यांच्या मालिकेत सलग तीन वेळा गोल्डन डकवर बाद झालेला सूर्या हा जगातील एकमेव खेळाडू आहे.

सूर्याने हा लाजिरवाणा विक्रम भारतीय मैदानावर केला आहे, ही मोठी गोष्ट आहे. या वर्षी मार्चमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची होम वनडे मालिका खेळला होता. या मालिकेत सूर्याने गोल्डन डकचा विक्रम केला. आता समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की एकदिवसीय विश्वचषकही भारतातच होत आहे. अशा स्थितीत सूर्याची ही कामगिरी पाहून काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT