Asia Cup PCB Chairman Ramiz Raja  esakal
क्रीडा

Asia Cup 2022 : पाकिस्तान - अफगाण राड्यानंतर रमीझ राजा करणार ICC कडे तक्रार

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 Afghanistan Pakistan Controversy : आशिया कपमधील पाकिस्तान अफगाणिस्तान सुपर 4 सामन्यात तुफान राडा झाला. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद मलिक आणि पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली यांच्यातील वादावादी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत गेली. या प्रकरणी आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमीझ राजा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी 130 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान पार करत असताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली. दम्यान, 18 व्या षटकात अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद मलिकने आसिफ अलीची विकेट घेतली. त्यानंतर सेलिब्रेशन करताना आसिफ आणि फरीदची वादावादी झाली. दरम्यान हा वाद एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत गेला. आसिफ अलीने तर मलिकवर बॅट देखील उगारली होती. अखेर खेळाडू आणि पंचांनी मध्यस्थी करत या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले. शेवटी पाकिस्तानने सामना 1 विकेट राखून जिंकला.

मात्र आता पीसीबीचे चेअरमन रमीझ राजा यांनी मैदानावरील हा वाद आयसीसीच्या दरबारात नेणार असल्याचे सांगितले. रमीझ राजा म्हणाले की, 'काल रात्री जे काही झालं त्याबद्दल आम्ही नक्कीच आयसीसीकडे आमची निराशा आणि दुःख आयसीसीपुढे मांडू.' यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील या प्रकरणावर भाष्य करताना अफगाणिस्तानचे खेळाडू आणि प्रेक्षकांना कसं वागायचं हे शिकण्याची गरज आहे.' पाकिस्तान - अफगाणिस्तान सामन्यातील मैदानात झालेला वाद हा नंतर प्रेक्षक गॅलरीत देखील पोहचला होता. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या चाहते स्टेडियममधील खुर्च्या एकमेकांना फेकून मारत होते.

दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी सीईओ शफिक स्तानिकझाई यांनी आसिफ अलीवर आशिया कपमधील पुढच्या सामन्यात बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT