Asia Cup BAN vs AFG Rashid Khan Mujeeb Ur Rahman Shine Afghanistan Restrict Bangladesh In 127 Runs  esakal
क्रीडा

Asia Cup BAN vs AFG : अफगाणी फिरकीपटूंनी बांगलादेशचे मोडले कंबरडे; मुजीबचा विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup BAN vs AFG : आशिया कप ग्रुप B मधील बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शारजावर होत असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला अफगाणी फिरकीपटूंनी चांगलेच रडवले. मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांच्या फिरकीसमोर बांगलादेशला 20 षटकात 7 बाद 127 धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशकडून मोसादेक हुसैनने 48 धावांची झुंजार खेळी केली. (Rashid Khan Mujeeb Ur Rahman)

याचबरोबर मुजीबने एक विक्रम देखील आपल्या नावावर केला. तो आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 200 विकेट घेणारा दुसरा सर्वात युवा गोलंदाज ठरला. त्याने ही कामगिरी 21 वर्ष 155 दिवसामध्ये पूर्ण केली. यापूर्वी राशीद धानने 20 वर्ष 31 दिवसांचा असताना टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण केल्या होत्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला मुजीबने दुसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर मोहम्मद नैबचा 6 धावांवर त्रिफळा उडवला. यानंतर त्यानंतर मुजीबने बांगलादेशचा दुसरा सलामीवीर अनामुल हकची देखील शिकार करत बांगलादेशची अवस्था 2 बाद 13 धावा अशी केली. मुजीबने बांगलादेशला दिलेल्या पाठोपाठच्या दोन धक्यातून सावरण्याचा प्रयत्न कर्णधार शाकिब अल हसन करत होता.

मात्र मुजीबने त्याची देखील 11 धावांवर असताना दांडी गुल करत बांगलादेशला पॉवर प्लेमध्येच तिसरा आणि मोठा धक्का दिला. मुजीबने एकट्याने पहिल्या सहा षटकातच बांगलादेशची टॉप ऑर्डर उडवली.

त्यानंतर अफगाणिस्तानचा अनुभवी लेग स्पिनर राशीद खानने आपला जलवा दाखवला. त्याने अनुभवी मुशफिकूर रहीमला अवघ्या 1 धावेवर पॅव्हेलियानचा रस्ता दाखवला. त्यानंतर अफिफ हुसैनला 12 धावांवर पायचीत पकडत बांगलादेशची अवस्था 5 बाद 53 धावा अशी केली. यानंतर मोहमदुल्ला आणि मोसादेक हुसैन यांनी सहाव्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सरूवात केली. मात्र ही भागीदारी राशीद खाननेच फोडली. त्याने धोकादायक मोहम्मदुल्लाला 25 धावांवर बाद केले.

मोहम्मदुल्ला बाद झाला त्यावेळी बांगलादेशच्या डावाची 15 षटके पूर्ण झाली होती. मात्र मोसादेक हुसैनने झुंजार खेळी करण्यास सुरूवात केली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करत 31 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली. त्याला मेहंदी हसनने 12 चेंडूत 14 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 38 धावांनी भागीदारी रचत संघाला 20 षटकात 7 बाद 127 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू

Snapchat New Feature : खुशखबर! स्नॅपचॅटमध्ये आलं भन्नाट फीचर; तुम्ही पाहिलं काय?

Michael Waltz : मायकेल (माइक) वाल्ट्झ- `इंडिया कॉकस’ व भारत

SCROLL FOR NEXT