Asia Cup Cricket Started By BCCI Former President NKP Salve After 1983 World Cup Humiliation Esakal
क्रीडा

Asia Cup 2022 : लॉर्ड्सवर नाकारले वर्ल्डकप तिकिट अन् आशिया कपच्या जन्माची कहाणी

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 : आशिया कप 2022 ची सुरूवात येत्या 27 ऑगस्टपासून होत आहे. भारत आपला पहिला सामना 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत खेळणार आहे. सध्या सोशल मीडियावर या सामन्याबाबत चांगलीच बझ निर्माण झाली आहे. भारताने आतापर्यंत सातवेळा आशिया कप जिंकला आहे. आता आठव्यांदा आशिया कपवर नाव कोरण्याासाठी रोहित शर्माचा संघ सज्ज झाला आहे. मात्र हा आशिया कप सुरू होण्यामागची कहानी फार रंजक आहे. चित्रपटाच्या कथेला साजेशी अशी ही आशिया कपच्या निर्मितीची कहाणी आहे. यात अपमान आहे, बदला आहे. (Asia Cup Cricket Started By BCCI Former President NKP Salve After 1983 World Cup Humiliation)

आशिया कप स्पर्धात सुरू करण्यात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री एनकेपी साळवे यांची मोठी भुमिका आहे. ही गोष्ट आहे 1983 ची. त्या काळात क्रिकेट जगतात इंग्लंडचा दबदबा होता. मात्र 1983 च्या इंग्लंडमधील वर्ल्डकपमध्ये भारताने अतिंम फेरी गाठली. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष एनकेपी साळवे यांना हा अंतिम सामना लॉर्ड्सच्या स्टँडमधून पहायचा होता. मात्र त्यांना तिकिट मिळाले नाही. त्याकाळी बीसीसीआयची जागतिक क्रिकेटमध्ये फारशी चालत नव्हती. मात्र या जिद्दी बीसीसीआय अध्यक्षांनी एक पण केला. त्यांनी काही करून वर्ल्डकप इंग्लंडच्या बाहेर काढणार अशी प्रतिज्ञा केली.

मात्र त्या काळातील दुबळ्या बीसीसीआयच्या अध्यक्षांसाठी ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. मात्र त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नूर खान यांना आपल्या सोबत जोडले. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष गामिनी दिसानायके हे देखील सामिल झाले. या सर्वांनी मिळून 1983 मध्ये 19 सप्टेंबरला नवी दिल्लीत आशियाई क्रिकेट कान्फरन्सची स्थापना केली. यामध्ये आयसीसीचे तीन पूर्ण सदस्य भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश होता. त्याचबरोबर बांगलादेश, मलेशिया आणि सिंगापूर यांना देखील सोबत घेतले. आशिया क्रिकेट काऊन्सील (ACC) अस्तित्वात येणे ही क्रिकेट जगतातील एक मोठी घटना होती. कारण यापूर्वी आयसीसी जगभरातील क्रिकेट नियंत्रित करत होते. मात्र आता ACC आंतरराष्ट्रीय क्रिकेट आयोजत करणारी पहिली प्रादेशिक संस्था बनली.

आशियाई क्रिकेट काऊन्सील यावरच थांबले नाही. त्यांना पूर्ण सन्मान हवा होता. त्यामुळे त्यांनी आपली स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेत आशियातील संघ खेळतात. या स्पर्धेला नाव दिले आशिया कप. 1984 साली पहिल्यांदा आशिया कपचे आयोजन करण्यात आले. पहिला हंगाम संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आला. या देशात भारताने अडचणीच्या काळात आयपीएल आयोजित केले आहे तर पाकिस्तानने काही वर्षे त्याला आपला बेस केलं होते. इथंच 2021 चा टी 20 वर्ल्डकप देखील झाला होता. आता यंदाचा आशिया कप देखील तेथेच होत आहे.

1984 साली सुरू झालेला हा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळला जात होता. मात्र यंदाच्या वर्षी हा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळला जाईल. भारताने सर्वाधिक सातवेळा आशिया कपवर आपले नाव कोरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT