श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारी आशिया चषक 2022 चा पाचवा साखळी फेरी सामना खेळला गेला. अतिशय महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने 2 विकेट्स राखून विजय मिळवला आणि सुपर-4 फेरीत प्रवेश केला. दरम्यान, क्रिकेट जगतात श्रीलंकेच्या विजयासह श्रीलंकेने चिंटिंग केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.(asia cup sri lankas secret code 2d the match was being played from the dressing room)
सामन्यादरम्यान श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड आणि संघाचे ऍनालिस्ट ड्रेसिंग रूममधून सिक्रेट कोड पाठवताना दिसले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल फोटोंमध्ये दिसते की, सिल्वरवूड संघाच्या ऍनालिस्टसोबत मिळून ड्रेसिंग रूममधून मैदानातील खेळाडूंना सूचक इशारा करत आहेत. त्यांच्यापुढील टेबलवर ‘2डी’ असे लिहिलेल्या दोन पाट्या दिसत आहेत. सध्या याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
यापूर्वीही 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या टी20 मालिकेत सिल्वरवूड यांनी सिक्रेट कोड पाठवताना पाहिले गेले होते. यावेळी ते इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांनी इंग्लंडचा तत्कालिन कर्णधार मॉर्गनला असे सिक्रेट कोड पाठवले होते. त्यावेळी त्यांच्यावर चिटिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.
आशिया कप 2022 मध्ये श्रीलंकेने रोमांचक सामन्यात बांगलादेशला हरवलं. श्रीलंकेने फक्त दोन विकेट राखून विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 183 धावा केल्या. श्रीलंकन संघाने चार चेंडू बाकी राखून विजय मिळवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.