Asian Champions Trophy : भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा 3-1 असा धुव्वा उडवत सेमी फायनल गाठली आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात हरमनप्रीतने (Harmanpreet) सर्वाधिक 2 गोल डागले. तर आकाश दीपनं (Akashdeep) 1 गोल केला. पाकिस्तानकडून जुनैदला 1 गोल डागण्यात यश आले. पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाने थाटात सेमीफायनल गाठली आहे.
हरमनप्रीतने (Harmanpreet) दोन्ही वेळा पेनल्टीची संधी गोलमध्ये रुपांतरित करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या लढतीमध्ये भारताने (Hockey India) पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम राखत भारतीय संघाने बाजी मारली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी बरोबरीनं खेळ केला. प्रत्येकी एक-एक गोलमुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला. भारतासाठी आकाशदीपने दुसरा गोल करुन संघाल 2-0 अशी आघाडी करुन दिली. पाकिस्तानच्या जुनैद मंजूरने एक गोल करत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण हरमनप्रीतने आणखी एक गोल डागत आघाडी 3-1 अशी भक्कम केली.
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या भारतीय संघाकडून Asian Champions Trophy स्पर्धेची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नव्हती. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दक्षिण कोरिया विरुद्ध हॉकी इंडियाने दमदार खेळ केला. पण अखेरच्या टप्पयात दक्षिण कोरियाने जबरदस्त कमबॅक करत सामना 2-2 असा बरोबरीत सोडवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यजमान बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाने दमदार कमबॅक केले. बांगलादेशला 9-0 असे एकतर्फी पराभूत करत आशियन चॅम्पियन होण्यासाठी सज्ज असल्याची भारतीय संघाने दाखवून दिले.
भारतीय संघातील स्टार खेळाडू हरमनप्रीत सिंहने चौथ्या क्वार्टरमध्ये वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल केला. भारतीय संघाचा उप-कर्णधार हरमनप्रीत सिंहने आठव्या मिनिटाला पहिला गोल डागला. 53 व्या मिनिटालाही पॅनल्टीच त्यानं सोनं केलं आणि दुसरा गोल नोंदवत संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. आकाशदीप सिंहने 42 व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल डागला होता. सामन्यातील 45 व्या मिनिटाला पाकिस्तानकडून एकमेव गोल नोंदवला गेला. भारतीय संघाचा स्पर्धेतील दुसरा विजय असून पाकिस्तान अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचलाय. भारताच्या खात्यात 6 गुण जमा झाले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर आहे. 2018 मध्ये भारत-पाक संघाने ही स्पर्धा संयुक्तरित्या जिंकली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.