Asian Games 2023 BCCI : बीसीसीआयने चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी आपले पुरूष आणि महिलांचे क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने 1998 मधील राष्ट्रकुल स्पर्धेवेळीही आपला क्रिकेट संघ पाठवला होता. मात्र त्यावेळी देखील बीसीसीआयने आपल्या संघाला (Team India) एशियन गेम्समधील खेळाडूंची सोय केलेल्या व्हिलेजमध्ये नाही तर दुसरीकडे राहण्याची सोय केली होती.
यंदाच्या एशियन गेम्ससाठी देखील बीसीसीआयने एशियन गेम्स व्हिलेजच्या ऐवजी 5 स्टार हॉटेलमध्ये आपले दोन्ही संघ ठेवणार आहे. ऋतुराज गायकवाड आणि स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणारे भारताचे दोन्ही क्रिकेट संघ हे हांगझोऊमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहे.
बीसीसीआयने गेल्या दोन हंगामात आपला संघ पाठवला नव्हता. मात्र यंदा बीसीसीआयने परवानगी दिली आहे. (India Men's Cricket Team)
जरी संघ पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबणार अशी चर्चा असली तरी बीसीसीआयने यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. काहींच्या मते ही विशेष वागणूक ठरेल.
भारतीय पुरूष क्रिकेट संघ आपली एशियन गेम्स मोहीम 5 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. ते उपांत्यपूर्व सामन्यात अफगाणिस्तान किंवा बांगलादेश विरूद्ध खेळतील. आयसीसी रँकिंगच्या आधारावर भारत थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे.
एशियन गेम्समध्ये पुरूष क्रिकेट स्पर्धेत 18 संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे क्वार्टर फायनलपर्यंत पोहचण्यासाठी दोन आठवडे तरी नक्कीच लागतील. त्यामुळेच भारतीय संघ उशिरा जाणार आहे. (India Women's Cricket Team)
इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआय अधिकारी म्हणाला की, 'भारतीय संघ गेम्स व्हिलेजमध्ये राहणार की दुसरीकडे याबाबत अजून चर्चा झालेली नाही. आपल्याला याबाबत काही दिवसात माहिती मिळेल.'
'आम्ही इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनशी प्रवास आणि इतर लॉजेस्टिकबाबत चर्चा करत आहोत. लॉजेस्टिक हा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अख्त्यारित येणारा विषय आहे.'
बीसीसीआय अधिकारी पुढे म्हणाला की, 'भारतीय संघ गेम्स व्हिलेजमध्ये राहणार की पंचतारांकित हॉटेलमध्ये याबाबतचा निर्णय हा सराव करण्यासाठी दिलेलं मैदान किती लांब आहे याच्यावर अवलंबून आहे.
जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला तर ऋतुराजच्या नेतृत्वाखालील संघाला 5 ऑक्टोबरला उपांत्यपूर्व सामना, 6 ऑक्टोबरला उपांत्य सामना आणि 7 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळावा लागणार आहे.
महिला संघाचे वेळापत्रक अजून जाहीर व्हायचं आहे. भारतीय पुरूष क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघ एकत्र प्रवास करण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.