Asian Games 2023 India win silver medals in rowing and shooting 
क्रीडा

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे उघडले खाते, नेमबाजी अन् रोईंगमध्ये जिंकले रौप्यपदक

Kiran Mahanavar

Asian Games 2023 India : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाचे खाते उघडले आहे. नेमबाजीत भारताने दिवसातील पहिले पदक जिंकले. दुसरे पदक पुरुष दुहेरी लाइटवेट स्कलमध्ये जिंकले. या दोन पदकांसह भारताने पदकतालिकेतही आपले नाव कोरले आहे. ही दोन्ही पदके रौप्य आहेत.

महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीत भारताने रौप्यपदक जिंकले. दुसरे रौप्य पदक रोईंगमध्ये जिंकले, जेथे भारतीय पुरुषांनी बाजी मारली.

भारताने नेमबाजीत जिंकले पहिले पदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीने भारताचे पदकतालिकेत खाते उघडले. येथे भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले. तिघींनी मिळून 1886 गुण मिळवले, ज्यामध्ये रमिताने 631.9 गुण मिळवले. मेहुलीने 630.8 तर आशीने 623.3 गुण मिळवले.

डबल स्कल्समध्ये भारताने जिंकले दुसरे पदक

नेमबाजीत रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या काही वेळातच भारताला डबल स्कल्समध्ये आनंद साजरा करण्याची आणखी एक संधी मिळाली. पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल्स प्रकारात भारताच्या अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी 6:28:18 अशा वेळेसह रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेचे सुवर्णपदक चीनकडे गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Seat Sharing: विधानसभेत रंगत! महाविकास आघाडीकडे मागितली स्वतंत्र लढण्याची परवानगी, कोणत्या पक्षाने केलं शक्ती प्रदर्शन?

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; देशांतर्गत शेअर बाजार कसा असेल?

Maharashtra Politics: निवडणुकीनंतर होणार प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ; सातवड यात्रेतील होईकाची भविष्यवाणी नेमकी काय?

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' बंद केली, शेतकरी सन्मान, पीएम आवासही थांबणार आहे का? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

Latest Maharashtra News Updates : कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT