Asian Games 2023 Men's Cricket Schedule : भारताचा पुरूष क्रिकेट संघ एशियन गेम्समधील ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकण्यासाठी चीनला रवाना झाली आहे. या संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. नुकतेच भारताच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले आहे. आता पुरूष संघाकडूनही अशीच सुवर्ण कामगिरी करण्याची अपेक्षा केली जात आहे.
स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडिया (साई) मीडियाने आज ट्विट करून भारतीय क्रिकेट संघ मुंबई विमानतळावरून चीनसाठी रवाना झाल्याची माहिती दिली.
ऋतुराज सोबतच यशस्वी जैसवल प्रभसिमरन सिंग, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी यांच्यावरही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. एनसीएचे प्रमुख आणि संघाचे कोच व्हीव्हीएस लक्ष्मण देखील संघासोबत आहेत.
आज संध्याकाळी संघ चीनमध्ये दाखल होईल. त्यानंतर ते उद्यापासूनच आपला सराव सुरू करतील. ऋतुराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत आपला दम दाखवला आहे. हात फॉर्म ते एशियन गेम्समध्ये देखील कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
भारताचा पहिला सामना हा 3 ऑक्टोबरला होणार आहे. भारत रँकिंगमध्ये अव्वल असल्याने थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळेल. अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका हे चार संघ थेट क्वार्टर फायनल खेळणार आहे.
एशियन गेम्स पुरूष क्रिकेट स्पर्धेचे ग्रुप
ग्रुप अ - मंगोलिया, मालदीव, नेपाळ
ग्रुप ब - कंबोडिया, हाँगकाँग, जपान
ग्रुप क - मलेशिया, सिंगापूर, थायलंड
क्वार्टर फायनल - भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान
भारताचा पहिला क्वार्टर फायनल सामना हा 3 ऑक्टोबरला सकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे.
भारताच्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे सोनी लीव्हवरून होणार आहे. तर लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स 5, सोनी टेन 3 वरून होणार आहे.
भारताचा एशियन गेम्ससाठीचा क्रिकेट संघ :
ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग, यशस्वी जैसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.