'Hanny' won the gold medal in javelin throw! Esakal
क्रीडा

Asian Para Games 2023 : भारताची विजयी घोडदौड सुरूच, भालाफेकमध्ये 'हॅनी'ने जिंकलं सुवर्णपदक!

India now has 11 gold, 12 silver and 13 bronze medals; 'Hanny' won the gold medal in javelin throw!

Kiran Mahanavar

चीनमधील हांगझो येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्स स्‍पर्धेत मध्ये भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. पुरुषांच्या भालाफेक F37/38 स्पर्धेत गेम रेकॉर्ड आणि 55.97 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह Haney ने भारतासाठी 11 वे सुवर्णपदक मिळवले.

याच स्पर्धेत बॉबीने 42.23 मीटर पूर्ण करून सहावे स्थान पटकावले. तर श्रेयांश त्रिवेदीने आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर T37 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.

पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने चार सुवर्ण, सहा रौप्य आणि 8 कांस्यपदके जिंकली होते. सलग दुसऱ्या एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणारे पती-पत्नी जोडपे मनीष कौरव-प्राची यादव आणि नीरज यादव हे दिवसाचे खास आकर्षण होते. भोपाळमध्ये प्रशिक्षण घेत असलेली ग्वाल्हेरची प्राची कॅनोइंगमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय ठरली. तिने KL-2 प्रकारात तर पती मनीष कौरवने कॅनोइंगमध्ये KL-3 प्रकारात कांस्यपदक जिंकले.

भारताने आतापर्यंत 11 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्य अशी एकूण 36 पदके जिंकली आहेत. पदकतालिकेत तो चौथ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणाऱ्या सर्व पॅरा खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने चार सुवर्ण, सहा रौप्य आणि आठ कांस्यपदके जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT